DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राज्यसभा खासदारांचा होणार भरघोस फायदा!

स्मार्ट टीव्ही, वॉच सारखी उपकरणे मिळणार.

DD News Marathi by DD News Marathi
May 31, 2025
in ताज्या बातम्या, राजकीय
0
राज्यसभा खासदारांचा होणार भरघोस फायदा!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ३१ मे २०२५

राज्यसभेच्या सदस्यांना अधिक तंत्रसमृद्ध करण्यासाठी सरकारकडून लवकरच एक मोठी भेट दिली जाणार आहे. या अंतर्गत खासदारांना स्मार्ट टीव्ही, टॅबलेट आणि वेअरेबल्स, ई-गॅझेट्स उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यसभा समितीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेच्या सदस्यांच्या आर्थिक हक्क योजनेंतर्गत नवीन संगणकीय व तांत्रिक सुविधा लागू करण्यात आल्या आहे.

वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांना डेस्कटॉप, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, प्रिंटर, स्कॅनर, यूपीएस आणि स्मार्ट फोनसारख्या सुविधा आधीच मिळत आहेत. स्मार्ट टीव्ही, स्मार्ट प्रोजेक्टर, पोर्टेबल प्रोजेक्टर स्क्रीन, टॅबलेट, स्मार्ट डिस्प्ले, स्मार्ट स्पीकर आणि वेअरेबल्स अशी नवीन गॅझेट्स देखील दिली जातील.या योजनेची माहिती राज्यसभेच्या ताज्या पत्रकातून देण्यात आली आहे.

ही नवीन स्मार्ट गॅझेट्स राज्यसभेच्या सदस्यांच्या कार्यक्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकांशी आणखी चांगला संवाद साधण्यास महत्त्व देण्यासाठी प्रभावी ठरतील. आधुनिक तंत्रज्ञानाशी संसद सदस्यांना जोडून त्यांचे काम अधिक प्रभावी बनवण्याच्या दृष्टीने, डिजिटल इंडियाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे सांगितले जाते.

राज्यसभेच्या तुलनेत लोकसभा खासदारांसाठी गॅझेट्सची यादी मर्यादित आहे व लवकरच त्यातही भर पडू शकते. लोकसभा सदस्यांना अजूनही स्मार्ट गॅझेट्स किंवा स्मार्ट फोनची सुविधा मिळत नाही, परंतु ते संगणक आणि संबंधित उपकरणे खरेदी करू शकतात, ज्याची रक्कम परतफेड केली जाते. याशिवाय लोकसभा सदस्यांना दोन सिम कार्ड दिली जातात. दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी संगणक आणि संबंधित उपकरणांची सुविधा समान प्रमाणात उपलब्ध आहे

‘या’ नवीन गॅझेट्सचा समावेश
स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट डिस्प्लेस्मार्ट प्रोजेक्टर आणि पोर्टेबल प्रोजेक्टर स्क्रीन्सटॅब्लेट संगणक आणि कीबोर्डस्मार्ट स्पीकर्स आणि वेअरेबल्स, स्मार्ट वॉच. अँटि-व्हायरस सॉफ्टवेअर, अत्याधुनिक स्पीकर्स, हेडफोन्स, वेबकॅम आणि एअरपॉड्स.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Assembly#MLA#Rajyasabha#SmartTV
Previous Post

पुण्यात खळबळ माजवलेले डॉ. महाजन हत्याकांड!

Next Post

तर पाकिस्तानचे चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता – राजनाथ सिंह!

Next Post
तर पाकिस्तानचे चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता – राजनाथ सिंह!

तर पाकिस्तानचे चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता - राजनाथ सिंह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.