DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

तर पाकिस्तानचे चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता – राजनाथ सिंह!

भारतीय सेनेचे राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक.

DD News Marathi by DD News Marathi
May 31, 2025
in ताज्या बातम्या, राजकीय
0
तर पाकिस्तानचे चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता – राजनाथ सिंह!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ३१ मे २०२५

‘१९७१च्या युद्धात नौदलही उतरल्याने पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळीही आपल्या नौदलाने पाकिस्तानवर वचक ठेवण्याची कामगिरी बजावली. या मोहिमेत आपल्या नौदलावर सक्रिय होण्याची वेळ आली असती तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानला ठणकावले.

राजनाथसिंह यांनी शुक्रवारी गोव्याच्या समुद्रात तैनात असणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’ला भेट देऊन नौदलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
आयएनएस विक्रांत ही देशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या युद्धनौकेने समुद्रात खोलवर गस्त घालून पाकिस्तानी नौदलाचे मनसुबे उधळले होते. या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी या युद्धनौकेस भेट देऊन नौदल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. ‘आपले हवाई दल पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत असताना नौदलाने अरबी समुद्रात अतिशय आक्रमकपणे युद्धसज्जता राखली होती. यामुळेच पाकिस्तानी नौदल काही आगळीक करण्याचे धैर्य दाखवू शकले नाही,’ असे ते म्हणाले.

‘या मोहिमेदरम्यान भारतीय नौदल सुप्तपणे कार्यरत होते; परंतु या मोहिमेचा प्रत्यक्ष भाग होण्याची वेळ नौदलावर आली असती तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते. पाकिस्तानने भविष्यात भारतासोबत काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची चव त्यांना चाखावी लागेल. याबाबत सरकारने नौदलाला मोकळीक दिली आहे,’ असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.

‘हाफीज, मसूदला भारताकडे सोपवा’
‘भारतासोबत पाकिस्तानला पुन्हा चर्चा करायची असेल तर त्यांनी प्रथम हाफीज सईद व मसूद अझर या दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे. हे दोघे केवळ भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांच्या यादीत आहेत असे नव्हे; तर अमेरिकेनेही त्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे,’ असे राजनाथ म्हणाले.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #IAF#INDIA#IndianNavy#OperationSindoor#Pakistan#RajnathSinh
Previous Post

राज्यसभा खासदारांचा होणार भरघोस फायदा!

Next Post

अकोल्यात किरकोळ वादातून निर्घृण खून!

Next Post
अकोल्यात किरकोळ वादातून निर्घृण खून!

अकोल्यात किरकोळ वादातून निर्घृण खून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.