DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

टीव्ही अभिनेता विभू राघवचं कर्करोगामुळे निधन!

विभूला 'निशा और उसके कझिन्स' मधून लोकप्रियता मिळाली होती.

DD News Marathi by DD News Marathi
June 4, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
टीव्ही अभिनेता विभू राघवचं कर्करोगामुळे निधन!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ जून २०२५

टीव्ही अभिनेता विभू राघवचं कर्करोगामुळे निधन झालं. विभूला ‘निशा और उसके कझिन्स’ मधून लोकप्रियता मिळाली. विभूचं खरं नाव, वैभव कुमार सिंग राघव होतं. विभू राघव बऱ्याच महिन्यांपासून आतड्याच्या कॅन्सरशी झुंज देत होता. कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात अभिनेता होता. पण त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्योत मालवली. विभूचं वय फक्त ३७ वर्षे होतं, त्यामुळे त्याच्या निधनानं चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना खूप दुःख होत आहे. विभूने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केलेला होता. विभूची ही पोस्ट शेवटची ठरली असून त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विभू म्हणतोय की, ‘नमस्कार मित्रांनो! उपचारांबद्दल अपडेट द्यावी, असं वाटलं. डिसेंबरमध्ये पीईटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की, कॅन्सर लिव्हरपासून छाती, पाठीचा कणा आणि इतर काही भागांमध्ये पसरला आहे. केमोथेरपीच्या चार सेशननंतरही स्कॅनमध्ये कोणतीही सुधारणा दिसून आली नाही, पण मी आशा सोडलेली नाही. आता एक नवीन उपचार सुरू आहे. फिंगर क्रॉस केलंय आणि मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.’

व्हिडिओमध्ये विभू खूपच आजारी असल्याचं दिसून येत आहे. पण तरीही तो आनंदी दिसतोय. आजाराशी न डगमगता कॅमेऱ्यासमोर आनंदी दिसतोय. कॅन्सरशी झुंज देताना विभू आर्थिक अडचणींचा सामना करत होता. इंडस्ट्रीतील त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याला मदत केली आणि चाहत्यांना मदतीचं आवाहनसुद्धा केलेलं.

विभुचीच जवळची मैत्रीण अदिती मलिकने इन्स्टाग्रामवर अभिनेत्याच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिनं लिहिलं की, ‘जर आपल्या जगाच्या पलीकडे एक नवीन जग घडत असेल, जिथे दुःख नसेल, फक्त प्रकाश आणि शांती असेल. तो आमच्यासाठी प्रेरणास्थान होता. त्याचा प्रवास अजून सुरू आहे..या जगापासून दूर कोणत्यातरी दुसऱ्या जगात.’ विभूचे मित्र-मैत्रीण मोहित मलिक, अंजली आनंद, अदिती मलिक आणि इतर अनेक जण त्याच्या उपचारासाठी पैसे जमा करत होते. अदितीने लिहिलं होतं की, ‘आम्ही शक्य तितके प्रयत्न केले आणि पैसे संपले आहेत. कृपया प्रार्थना करा आणि शक्य तितकी मदत करा.’

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Cancer#Nisha_aur_UskeCousins#TVActor#VaibhavSinghRaghav#VibhuRaghav#VibhuRaghavDeath
Previous Post

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय!

Next Post

RCB ने ट्रॉफी पटकवताच विजय मल्ल्याला अपार आनंद!

Next Post
RCB ने ट्रॉफी पटकवताच विजय मल्ल्याला अपार आनंद!

RCB ने ट्रॉफी पटकवताच विजय मल्ल्याला अपार आनंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.