DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘हाऊसफुल ५’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

चार दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई.

DD News Marathi by DD News Marathi
June 10, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
‘हाऊसफुल ५’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १० जून २०२५

अक्षय कुमार याच्या ‘हाऊसफुल ५ ‘ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपटानं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी १३.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं चार दिवसांत १०१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘हाऊसफुल ५’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी १३.५० कोटींची कमाई केली आहे.चित्रपटानं केवळ चार दिवसांत नुसताच १०० कोटींचा आकडा पार केला नाही, तर जाट (९०.४० कोटी) आणि केसरी २ ( ९४.३७ कोटी) यांच्या लाइफ टाइम कलेक्शनलाही मागं टाकले आहे. ‘हाऊसफुल ५’ हा यावर्षीचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय.

‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट जवळपास २२५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटानं चार दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला आहे.जर या चित्रपटानं याच वेगाने कमाई केली, तर दुसऱ्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १५० कोटींचा आकडा पार करू शकतो.

तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ मध्ये अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख , अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जॅकलिन फर्नांडिस, नगरिस फाखरी आणि सोनम बाजवा यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २४ कोटींची कमाई केली होती. शनिवारी ३१ कोटी आणि रविवारी ३२ कोटींची कमाई केली. अशा प्रकारे तीन दिवसांत ८७.५ कोटींची कमाई केली. या चित्रपटानं सोमवारी देखील चांगली कमाई केली आहे.अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

दोन वर्जनमध्ये रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल ५’ ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. रिलीजच्या आधीच या चित्रपटाबद्दल खूप चर्चा होती. त्यामुळं चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AbhishekBachchan#AkshayKumar#boxofficecollection#Housefull5#RiteshDeshmukh#Rs100CroreClub
Previous Post

आदिवासी पारधी समाजावरील अन्याय प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी २५-२६ जूनला नागपुरात!

Next Post

जयंत पाटलांची पद सोडण्याची इच्छा!

Next Post
जयंत पाटलांची पद सोडण्याची इच्छा!

जयंत पाटलांची पद सोडण्याची इच्छा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.