DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटात विमान रहिवासी भागात कोसळले!

इमारतीचा भाग विमान कोसळल्याने पडला.

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या
0
अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटात विमान रहिवासी भागात कोसळले!

 

 

अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १२ जून २०२५

आज (१२ जून) दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलाईनर 787 क्रॅश झाले. या विमानात 242 प्रवासी होते, या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे येत आहेत. विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जात असताना ही दुर्घटना घडली. या विमानात प्रवास करत असलेल्यांची नावे अजून पुढे आली नसून बचावकार्य राबवले जात आहे. विमानाचे अवशेष मेघानीनगर परिसरात आढळले आहेत. आग आणि धुरांचा लोट दूरपर्यंत दिसत आहे.

विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. या अपघातात जखमी झालेल्यांना सरकारी रूग्णालयात दाखल केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर रूग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. तात्काळ रूग्णालयात पोहोचण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सरकारी रूग्णालयात एकच धावपळ सुरू असल्याचेही एक चित्र बघायला मिळतं.

विमान टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर विमानाचा जवळपास संपूर्ण भाग जळाला आहे. हेच नाही तर विमान ज्या इमारतीवर धडकले, त्या इमारतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनकडे जात होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील होते असं समजलं आहे. त्यांचा सीट क्रमांक 2D होता.

अपघातानंतर एक भीतीचे वातावरण परिसरात बघायला मिळत आहे. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दलची माहिती ही अजून मिळू शकली नाहीये. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. जखमींना रूग्णालयात दाखल केले जात आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये हा अपघात झाल्याचेही कळत आहे. सोशल मीडियावर या अपघात अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Ahemadabad#BoingDreamliner787#Gujrat#PlaneCrash#VallabhbhaiPatelAirport#VijayRupani
Previous Post

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली!

Next Post

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत या चेहऱ्यांना संधी!

Next Post
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत या चेहऱ्यांना संधी!

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत या चेहऱ्यांना संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.