बारामती प्रतिनिधी : राहुल चव्हाण
दि. १२ जून २०२५
बारामती -माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी हा निळकंठेश्वर पॅनल सर्व पक्षीय असल्याचे सांगितले आहे.
अजित पवार गटाकडून हे उमेदवार रिंगणात…
माळेगाव मतदार संघातून बाळासाहेब पाटील तावरे, रणजीत उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव आणि राजेंद्र सखाराम बुरुंगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर पणदरे मतदारसंघातून तानाजी तात्यासो कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप आणि योगेश धनसिंग जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सांगवी मतदारसंघामधून विजय श्रीरंगराव तावरे,विरेंद्र अरविंद तावरे गणपत चंदरराव खलाटे यांना तर खांडज शिरवली मतदारसंघातून प्रताप जयसिंग आटोळे आणि सतिश जयसिंग फाळके हे मैदानात आहेत.
यासोबतच निरावागज मधून जयपाल निवृत्ती देवकाते आणि अविनाश गुलाबराव देवकाते तर बारामती मधून नितीन सदाशिव सातव आणि देवीदास सोमनाथ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः अजित अनंतराव पवार रिंगणात आहेत.
अनूसूचित जाती/जमाती मधून रतनकुमार साहेबराव भोसले तर महिला राखीव प्रतिनिधी मधून संगिता बाळासाहेब कोकरे आणि ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून नितीन वामनराव शेंडे यांना तर भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मधून विलास ऋषीकांत देवकाते यांना उमेदवारी दिली असून श्री निळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून 21 उमेदवार मैदानात आहेत.