DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बाप्पा पावला आणि मी वाचले! देव तारी, त्याला कोण मारी?

अपघातातून वाचलेल्या भूमीनं थरथरत्या आवाजात देवाचे आभार मानले! 10 मिनिटांचा उशीर आणि...

DD News Marathi by DD News Marathi
June 13, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
बाप्पा पावला आणि मी वाचले! देव तारी, त्याला कोण मारी?

अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १३जून २०२५

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात २४२ जण होते. यापैकी १२ कर्मचारी होते. या अपघातातून एक जण जिवंत बचावला आहे. ११ ए आसन क्रमांकावर बसलेले प्रवासी रमेश विश्वकुमार या अपघातातून चमत्कारिकपणे बचावले. विमान अपघातातून ते अगदी थोडक्यात बचावले. अपघाताची तीव्रता पाहता बहुतांश जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

भूमी चौहान नावाची तरुणी या अपघातातून अगदी थोडक्यात बचावली. विमान पकडण्यास उशीर झाल्यानं तिचा जीव वाचला. अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यास भूमीला उशीर झाला. वाहतूक कोंडीमुळे ती विमानतळावर १० मिनिटं उशिरा पोहोचली. उशीर झाल्यानं तिला विमान पकडता आलं नाही. तिला बोर्डिंगची परवानगी देण्यात आली नाही.

एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या सहा मिनिटांत अपघात झाला. विमान ४०० फूट उंचीवरुन अचानक खाली आलं. पायलटला परिस्थिती हाताळण्यासाठी केवळ १ मिनिट मिळालं. इतक्या कमी वेळात अपघात टाळणं निव्वळ अशक्य होतं. अपघाताची माहिती मिळताच भूमी चौहान थरथर कापू लागली. तिचा अक्षरश: थरकाप उडाला. बराच वेळ ती मानसिक धक्क्यात होती.

भूमी चौहाननं स्वत:ला सावरत तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. ‘मला केवळ १० मिनिटं उशीर झाला. त्यामुळे मला फ्लाईट पकडता आली नाही. विमान पकडता न आल्यानं दु:खी मनानं विमानतळावरुन परतत असताना मला अपघाताबद्दल समजलं. त्यावेळी मी एक्झिट गेटला होते. काही मिनिटांमुळे मिस झालेल्या विमानाचा अपघात झाल्याचं त्यावेळी मला समजलं,’ असं भूमी चौहाननं सांगितलं.

अपघाताबद्दल समजताच भूमी काही वेळ सुन्न झाली. त्यानंतर ती घरी परतली. भूमी लंडनमध्ये पतीसोबत राहते. आज ती पतीकडे परतणार होती. सुट्टी घालवण्यासाठी ती भारतात आली होती. विमानतळावर उशिरा पोहोचल्यानं तिचा जीव वाचला. माझ्या गणपती बाप्पानं मला वाचवल्याच्या भावना तिनं व्यक्त केल्या. भूमी दोन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AhemadabadPlaneCrash#BhoomiChauhan
Previous Post

विमान अपघातानंतर विकृतीची पराकाष्ठा!

Next Post

पायलटच्या मेसेजनंतर काही सेकंदांची शांतता आणि…

Next Post
पायलटच्या मेसेजनंतर काही सेकंदांची शांतता आणि…

पायलटच्या मेसेजनंतर काही सेकंदांची शांतता आणि...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.