DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

विमानातील लोकांशिवाय जमिनीवरील ३३ लोकांचा समावेश.

DD News Marathi by DD News Marathi
June 14, 2025
in ताज्या बातम्या
0
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

गांधीनगर प्रतिनिधी :
दि. १४ जून २०२५

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. यातच घटनेनंतरचे चित्र मन हेलावणारे आहे. यातच बचाव पथकांना एअर इंडिया AI171 विमानातून बाहेर पडलेला ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. तर आणखी २९ मृतदेह देखील हाती लागले आहेत. त्यामुळे या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता २७४ वर पोहोचली आहे. भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासातील हा सर्वात भयानक अपघात आहे.

या अपघातात विमानातील २३० प्रवाशांसह १२ पैकी ११ क्रु मेंबर्स असे एकूण २४१ जण मृत्यूमुखी पडले. तर केवळ एक जण बचावला आहे. तर ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले त्याच्यावर देखील विमान अपघाताचा आघात झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढून आता २७४ वर पोहोचली आहे. इतर ३३ बळी हे बी जे मेडिकल कॉलेजच्या परिसरातील लोकांचे गेले असावेत असे सांगण्यात येते. डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय विद्यार्थी, कामगार आणि मेघानीनगर परिसरातील असे काही जण या अपघाताला बळी पडल्याचे समजते.

सह पोलीस आयुक्त नीरज बडगुजर यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या मेसच्या छतावर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. गुरुवारी रात्री विमानाचे आपत्कालीन स्थान ट्रान्समीटरही सापडले, असेही ते म्हणाले. तर एअरक्राफ्ट अपघात तपास संस्थेनेही बॉक्स मिळाल्याची माहिती दिली आहे.

या अपघाताचा सर्वाधिक फटका हॉस्टेलची इमारत आणि जवळपासच्या परिसरात बसला आहे, जिथे शोध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. घटनेबाबात राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीकरिता ३१९ मृतदेहांचे अवयव पाठवले आहेत. ज्यात पूर्ण आणि आंशिक अवशेषांचा समावेश आहे.

AI 171 विमान अपघाताच्या तपासादरम्यान २४ तासांहून अधिक काळानंतर अधिकाऱ्यांना ब्लॅक बॉक्स सापडला आहे. मेघनीनगर परिसरातील बी जे मेडिकल कॉलेजच्या यूजी आणि पीजी मेस इमारतीच्या छतावर शुक्रवारी डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असलेला ब्लॅक बॉक्स सापडला. तर विमान कोसळला त्या दिवशी रात्री विमानाचा आपात्कालीन लोकेशन ट्रान्समीटरही सापडला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Ahemadabad#PlaneCrash#PlaneCrashVictims
Previous Post

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

Next Post

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

Next Post
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.