DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

श्रीवर्धन येथील विविध विकासकामांचे अजित पवार यांच्या हस्ते उद्धघाटन

DD News Marathi by DD News Marathi
June 5, 2021
in राजकीय, महाराष्ट्र
0
कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. ०५ जुन २०२१

गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तोक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळांनी कोकणातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र हे महाविकास आघाडीचे शासन सदैव कोकणातील जनतेच्या सोबत आहे. कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्रीवर्धन येथे केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकात श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाचे तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. त्यानंतर येथील र.ना.राऊत हायस्कूलच्या प्रांगणातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे तर पालकमंत्री कु.आदिती तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष फैसल मियाजान हुर्जुक, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, मुख्याधिकारी किरण मोरे, पाणीपुरवठा जलनि:सारण व अपंग कल्याण समिती सभापती किरण केळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.दिशा नागवेकर, क्रीडा व युवक कल्याण समिती सभापती सौ.रहमत आराई, स्वच्छता वैधक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ.गुलाब मांडवकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती वसंत यादव, नगरसेवक, नगरसेविका सर्वश्री जितेंद्र सातनाक, श्रीमती सीमा गोरनाक, श्रीमती कामिनी रघुवीर, शबिस्ता सरखोत, अनंत गुरव, प्रितम श्रीवर्धनकर, श्रीमती अंतिम पडवळ, श्रीमती प्रतिक्षा माळी, श्रीमती मीना वेश्विकर, स्वीकृत नगरसेवक अब्दुल कादिर काशीम राऊत, सुनिल पवार, गटनेता बबन चाचले व दर्शन विचारे आदि उपस्थित होते.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

शिवराज्य समुहाचे अध्यक्ष भुपेंद्र मोरे आयोजित न-हे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Next Post
शिवराज्य समुहाचे अध्यक्ष भुपेंद्र मोरे आयोजित न-हे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

शिवराज्य समुहाचे अध्यक्ष भुपेंद्र मोरे आयोजित न-हे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.