DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा

DD News Marathi by DD News Marathi
June 20, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २० जून २०२५

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले आहे. १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० जून रोजी, शुक्रवारी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.

दरम्यान विवेक लागू यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी मराठीसह हिंदीमध्येही काम केले होते. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (२००८), ‘अग्ली’ (२०१३), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (२०१५), ‘३१ दिवस’ (२०१८) इ. कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही गाजल्या होत्या.

विवेक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्या, त्यांच्या पत्नी रीमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव नयन बडबडे असं होतं. रीमा यांनी अभिनय करता करता बँकेत नोकरी धरली, तेव्हा कलाकारांसाठी खास कोटा होता. बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान त्यांची आणि विवेक यांची भेट झाली होती. विवेक तेव्हा २३ वर्षांचे होते तर, नयन म्हणजेच रीमा यांचे वय १८ होते. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९७८ साली लग्नगाठ बांधली. जवळपास तीन दशके एकत्र संसार केल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या नात्यात कटूता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. घटस्फोटानंतरही अभिनेत्रीने रीमा लागू हेच नाव लावले होते. रीमा यांचे २०१७ साली अपघाती निधन झाले, तोपर्यंत घटस्फोट झालेला असतानाही त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते होते.

विवेक आणि रीमा यांची लेक मृण्मयी लागू वायकुळ हिने बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. ‘थप्पड’, ‘स्कूप’सारख्या गाजलेल्या प्रोजेक्टची लेखिका म्हणून तिने ओळख मिळवली. तिने अभिनय केलेला ‘मुक्काम पोस्ट लंडन’ हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी गाजला होता.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MarathiActor#MarathiMovies#ReemaLagu#VivekLagu
Previous Post

भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

Next Post

पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

Next Post
पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.