DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पातूरचे नायब तहसिलदार ACB च्या जाळ्यात!

केली होती रु. ४००० लाचेची मागणी.

DD News Marathi by DD News Marathi
June 21, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पातूरचे नायब तहसिलदार ACB च्या जाळ्यात!

अकोला प्रतिनिधी : मनीष खर्चे
दि. २१ जून २०२५

शेतीचे हद्दी खुणा कायम करून त्याबाबतचा आदेश देण्याकरीता पातुर तहसिलचे महसुल नायब तहसिलदार बळीराम चव्हाण यांनी रूपये चार हजार लाच रक्कमेची मागणी केल्या प्रकरणी एसीबी अँटी करप्शन ब्यूरो च्या जाळ्यात अडकले आहेत. प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील तक्रारदार यानी ११ जून २०२५ रोजी अॅंटी करप्शन ब्युरो, अकोला येथे तक्रार दिली की, त्यांचे शेतीचे हद्दी खुणा कायम करून त्याबाबतचा आदेश देण्याकरीता पातुर तहसिलचे महसुल नायब तहसिलदार बळीराम चव्हाण हे रू. ४,०००/- लाच रक्कमेची मागणी करीत आहेत. या तक्रारीवरून १२ जून २०२५ रोजी तहसिल कार्यालय पातुर येथे पंचासमक्ष आजमाविण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान महसुल नायब तहसिलदार बळीराम चव्हाण यांनी तक्रारदारास रूपये ४ हजार लाच रक्कमेची मागणी केली तसेच सदर वेळी त्यांचे कार्यालयात उपस्थित असलेले एका इसमाने तक्रारदारास लाच रक्कम देण्याकरीता प्रोत्साहीत केल्याचे निष्पन्न झाले. १२ जून २०२५ रोजी तहसिल कार्यालय पातुर येथे शासकीय पंचांसमक्ष सापळा कार्यवाही आजमाविण्यात आली असता, सदर सापळा कारवाई दरम्यान बळीराम चव्हाण, महसुल नायब तहसिलदार यांनी तक्रारदाराकडुन लाच रक्कम घेण्यास टाळाटाळ केली. दोन्ही आरोपीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे पोलीस स्टेशन पातुर ता. पातुर, जि. अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई मारूती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अ.क. ब्युरो अमरावती व मिलींदकुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक अ. क. ब्युरो अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, प्रविण वेरूळकर, पोलीस अंमलदार प्रदीप गावंडे, संदीप नाले, डिगांबर जाधव, निलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार, असलम व चालक सलीम खान, चालक नफीस खान यांनी केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Akola#NayabTahasildar#Patur
Previous Post

पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी खुशखबर!

Next Post

एअर इंडियातून 3 अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी निश्चित?

Next Post
एअर इंडियातून 3 अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी निश्चित?

एअर इंडियातून 3 अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी निश्चित?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अफजल खान वाटतात उद्धव ठाकरे!

अफजल खान वाटतात उद्धव ठाकरे!

July 5, 2025
१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

July 4, 2025
शहांसमोर एकनाथ शिंदेंचा  “जय गुजरात!” चा नारा!’

शहांसमोर एकनाथ शिंदेंचा “जय गुजरात!” चा नारा!’

July 4, 2025
मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

July 3, 2025
अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

July 2, 2025
मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

July 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.