DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन मांत्रिक बोलावण्यात आला?

रामदासभाई कदम यांचा खळबळजनक दावा.

DD News Marathi by DD News Marathi
June 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन मांत्रिक बोलावण्यात आला?

मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जून २०२५

राज्याच्या राजकारणात सध्या काळी विद्या आणि काळी जादू यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपाला रामदासभाई कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे सेनेकडून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशा स्वरूपाचे आरोप झाले आहेत. आता या सगळ्याला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केलं आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये म्हणून हैद्राबादवरून एक मांत्रिक आणला गेला असा खळबळजळक आरोप रामदासभाई कदम यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्याने खळबळ उडाली आहे.

या मांत्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवला, त्यानंतर पाच दिवस खोपोलीत त्यांचं जे राहण्याचे ठिकाण आहे तिथं पाच दिवस ठेवला आणि तिथे बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली हे खरं आहे की खोटं आहे असा सवाल त्यांनी केला. या तांत्रिकाला शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील एक खासदार घेऊन आला असा दावा करत ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे एकदा उद्धव ठाकरे यांना विचारून घ्या अशा शब्दात ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली आहे. आणि मी त्याचे फोटो देईन मी त्याचं नाव देईन मी पुराव्यासकट बोलतो असाही मोठा दावा रामदासभाई कदम यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलंय. मी पुराव्यासकट बोलतो बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हे आम्हाला माहिती आहे. आम्ही भास्कर जाधव यांच्यासारखी हवेत तलवार कधीही चालवत नाही. ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारे जग पिवळे दिसतं, असंही रामदास कदम म्हणाले.

दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या बोलण्याला आपण फार किंमत देत नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा शब्दात उत्तर देत रामदास कदम यांनी केलेली दावे फेटाळले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdityaThackeray#Matoshree#ramdasbhaikadam#UddhavThackeray
Previous Post

सोयाबीन पीक लागवड व उत्पादन वाढ संदर्भात परिसंवादाचे आयोजन!

Next Post

प्राजक्त तनपुरेंची कारखान्याच्या निवडणूकीत सरशी!

Next Post
प्राजक्त तनपुरेंची कारखान्याच्या निवडणूकीत सरशी!

प्राजक्त तनपुरेंची कारखान्याच्या निवडणूकीत सरशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.