DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्राजक्त तनपुरेंची कारखान्याच्या निवडणूकीत सरशी!

पण 'चेअरमन' काकांनीही दिला धक्का, देवगिरीवर रात्रीत 'घड्याळ' जवळ केलं.

DD News Marathi by DD News Marathi
June 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
प्राजक्त तनपुरेंची कारखान्याच्या निवडणूकीत सरशी!

अहिल्यानगर प्रतिनिधी :
दि. २५ जून २०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसेच बाजार समितीचे सभापती, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मोठा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अधिकृत प्रवेश केला. शरद पवार यांच्यासोबत असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र आता प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरेंनी एकतर्फी विजय मिळवत कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, त्याला आता अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी महत्त्वपूर्ण शिष्टाई केली. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
पुढील आठवड्यात अरुण तनपुरे यांचे समर्थक व स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा समूह अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते असलेले अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकारणात गणितं बदलत असतात, कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही, कारखाना निवडणुकीवेळी असं वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या मनात चाललंय तरी काय? अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता अरुण तनपुरेंनी अजित पवार गटात प्रवेश केला असून प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#aruntanpure#prajakttanpure#tanpuresugarfactory
Previous Post

आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन मांत्रिक बोलावण्यात आला?

Next Post

मेकअप करून बळेच भाकऱ्या भाजायच्या अन् शोऑफ करायचा!

Next Post
मेकअप करून बळेच भाकऱ्या भाजायच्या अन् शोऑफ करायचा!

मेकअप करून बळेच भाकऱ्या भाजायच्या अन् शोऑफ करायचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.