DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नागपूरात पारधी समाजाच्या न्यायासाठी ऐतिहासिक सुनावणी!

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कठोर आदेश.

DD News Marathi by DD News Marathi
June 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नागपूरात पारधी समाजाच्या न्यायासाठी ऐतिहासिक सुनावणी!

नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २६ जून २०२५ :

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षतेखाली काल रविभवन, नागपूर येथे पारधी समाजाच्या राज्यभरातील पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी १४ एप्रिल रोजी रविभवन येथे झालेल्या परिषदेत पारधी समाजावर जाणीवपूर्वक झालेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या ११८ प्रकरणांवर सविस्तर चर्चा झाली होती. यांपैकी निवडक १५ प्रकरणांची सुनावणी २५ जून रोजी पार पडली. उर्वरित प्रकरणांची सुनावणी गुरुवार दिनांक २६ जून रोजी होणार आहे.

या सुनावणीदरम्यान, अनुसूचित जाती-जमाती आयोगाने पारधी समाजावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी नागपूर आयुक्त आयुशी सिंह, उपायुक्त दिगंबर चव्हाण,नागपूर एकात्मिक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर,यांनी सुनावणी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच ऐतिहासिक पारधी न्याय संकल्प परिषदेत राज्यभरातील संबंधित जिल्ह्यातील उप जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वन अधिकारी, महसूल अधिकारी, तहसीलदार आणि ठाणेदार आदींची उपस्थिती होती.

आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पारधी समाजाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सुनावणीचे आयोजन केले. त्यांच्या या पुढाकाराचे आदिवासी सेवक बबन गोरामन, प्रदेश युवा अध्यक्ष आतिश पवार, अनिल पवार, राहुल राजपूत, शिवसाजन राजपूत,निकेश माळी यांनी आभार मानले.

पारधी समाजावर जाणीवपूर्वक अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्याचे आदेश आयोगाने दिले असून, यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.ही सुनावणी पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचे यातून दिसून आले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #babangoraman#Nagpur#Paradhi
Previous Post

महाराष्ट्रात पाऊस काहीसा विसावला, पण…

Next Post

भारताच्या शुभांशू शुक्लाने घेतली अंतराळ ‘भरारी’!

Next Post
भारताच्या शुभांशू शुक्लाने घेतली अंतराळ ‘भरारी’!

भारताच्या शुभांशू शुक्लाने घेतली अंतराळ 'भरारी'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.