DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढणार ! अपूर्व हिरे भाजपप्रवेश करणार!

बर्‍याच समर्थकांसह बुधवारी होणार प्रवेश.

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपची ताकद नाशिकमध्ये वाढणार ! अपूर्व हिरे भाजपप्रवेश करणार!

नाशिक प्रतिनिधी :
दि. ३० जून २०२५

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे बुधवारी (दि.२) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी १२ वाजता हा प्रवेश सोहळा होईल.

डॉ. हिरे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी दोनवेळा भेट घेतल्याने ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात होते. परंतु, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु याबाबत योग्यवेळी भूमिका स्पष्ट करू, असे डॉ. हिरे यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांनी रविवारी (दि.२९) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार असल्याची अधिकृत माहिती डॉ. अपूर्व हिरे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांस आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती डॉ. हिरे यांनी दिली. डॉ. हिरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे बळ वाढणार आहे.

गेल्या आठवड्यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनासह भाजपमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ आता डॉ. अपूर्व हिरे हेदेखील पक्षप्रवेश करीत असल्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. बडगुजर आणि हिरे या दोघांनीही यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली आहे. मागील पंचवार्षिक काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने हिरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती . दोघेही अनुभवी आणि प्रभावशाली नेते असल्याने महापालिका निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BJP#Nashik#NCPApoorvaHiray
Previous Post

शुभमन गिलच्या एका कॉलवर…काय झालं?

Next Post

संजय राऊतांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम भडकले!

Next Post
संजय राऊतांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम भडकले!

संजय राऊतांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम भडकले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

July 4, 2025
शहांसमोर एकनाथ शिंदेंचा  “जय गुजरात!” चा नारा!’

शहांसमोर एकनाथ शिंदेंचा “जय गुजरात!” चा नारा!’

July 4, 2025
मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

July 3, 2025
अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

July 2, 2025
मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

July 2, 2025
“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

July 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.