DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

अधिक रकमेसाठी वाहनचालक धरले जाताहेत वेठीस.

DD News Marathi by DD News Marathi
July 2, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
दि. ०२ जुलै २०२५

शासनाने जुन्या वाहनांना नवीन हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 66 हजार 72 वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना नवीन हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविली आहे. तर एक लाख सहा हजार 142 वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी ऑर्डर बुक केली आहे. जिल्ह्यात 12 लाख 75 हजार 786 वाहनांपैकी तेरा टक्के वाहनधारकांनी हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी प्रतिसाद दिल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी संस्थेचीही नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने नागरीकांना नंबर प्लेट बसविण्यासाठी विविध ठिकाणी फिटमेट सेंटर्स देण्यात आली आहेत. जिल्ह्यात अशा फिटमेंट सेंटर्सची संख्या 581 इतकी आहे. या फिटमेंट सेंटरवर वाहनधारक आपल्या वाहनांची कागदपत्रे घेऊन जाऊन, त्या ठिकाणी नंबर प्लेटसाठी ऑर्डर बुक करीत आहेत.

हायसिक्युरीटी नंबर प्लेट नागरिकांनी बसवावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाच्या वतीने हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी अर्ज न केलेल्या किंवा नवीन नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांची कामे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक वाहनधारकांची कामेही आरटीओ कार्यालयात थांबविण्यात आलेली आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांनी त्यांचे वाहनांची संबंधित कामे आरटीओ कार्यालयात व्हावी यासाठी फिटमेंट सेंटरवर जाऊन, आपल्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑर्डर बुक केली आहे.

आरटीओ विभागाकडून सदर कारवाई केल्यानंतरही वाहनधारकांमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. आरटीओ विभागांतर्गत फक्त 12 ते 13 टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेटच्या निर्णयाला प्रतिसाद दिला आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बाबत काही तक्रारी असल्यास, आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी नोंदविण्याबाबत आरटीओ विभागाने आवाहन केले आहे. आतापर्यंत संकेत स्थळावर 930 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यात अतिरीक्त पैसे घेणे, ऑर्डर वेळेवर न पूर्ण करणे यासह अन्य तक्रारींचा समावेश आहे.

नवी पाटी तुटण्याची दाखवली जाते भीती

शहरातील अनेक फिटमेंट सेंटरवर वाहनधारक ऑर्डर घेण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी, साहेब प्लेट खूप पातळ आहे. ही प्लेट कधीही तुटू शकेल. पुन्हा नंबर प्लेट बसविण्यासाठी तुम्हाला पोलिस तक्रार नोंदवावी लागेल. त्यापेक्षा आता दोनशे रुपये खर्च करून नंबर प्लेटला गार्ड लावा, असा आग्रह करीत आहेत. नंबर प्लेटसह या गार्डचाही भुर्दंड वाहनधारकांना सोसावा लागत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #chhatrapatisambhajinagar#HSRP#RTO
Previous Post

“पतीसाठी महिला धोकादायक…!”

Next Post

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

Next Post
मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी 'भारुडाचा' प्रभावी वापर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

July 4, 2025
शहांसमोर एकनाथ शिंदेंचा  “जय गुजरात!” चा नारा!’

शहांसमोर एकनाथ शिंदेंचा “जय गुजरात!” चा नारा!’

July 4, 2025
मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

July 3, 2025
अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

July 2, 2025
मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

July 2, 2025
“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

July 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.