सिंधुदुर्ग प्रतिनिधी :
दि. ०५ जुलै २०२५
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी मोठे भाष्य केले. नितेश राणे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना सुप्रिया सुळे यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा असे वाक्य वापरले होते. त्याचा आज प्रत्यय आलाय. बाळासाहेबांचा आशीर्वाद फडणवीस यांच्या डोक्यावर असल्याचेही राणेंनी म्हटले. अंतरपाट दूर झाला असं उद्धव ठाकरे बोलले, नवरा कोण आणि नवरी कोण उद्धव ठाकरेंच्या हालचाली वरून समजले असेल. ठाकरेंच्या व्यासपीठावर कॉमरेड आणि समाजवादी विचारांचे लोक होते हे बाळासाहेबांना आवडलं असत का? असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना नितेश राणेंनी म्हटले की, जो तुमच्या व्यापीठावर उपस्थित होता, त्याला विचारा मुंब्र्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार? मुंबऱ्यामधील युवकाला मारहाण करुन हिंदी बोलायला लावली होती. 9 महिन्या अगोदर निवडणुका झाल्यात त्यात महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. जनतेने ऐतिहासिक मतं दिली होती. यावरून पुढील निवडणुकांचा अंदाज लावा. आमच्या सारख्या धोंड्याना जनतेने विधिमंडळात बसवलं आहे, आम्ही जनतेच्या मनात आहोत उद्धव ठाकरेंनी धोंडे बोलून जनतेचा अपमान केलाय.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना काय काय त्रास दिला होता आणि आज त्यांच्या समोर उद्धव ठाकरेंला नाक घासावं लागलं. आता मुस्लिम लीगसोबत युती करा तेच शिल्लक आहे, असेही नितेश राणेंनी म्हटले. ते पुढे म्हणाले, हिंदू समाज बारकाईने बघतोय. महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला जनता दाखवून देईल. राज साहेबांची रस्त्यावरील सत्ता त्यांना लखलाभ होवो. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मोदी आणि फडणवीस करत आहेत. आज बाळासाहेब असते तर देवेंद्र फडणवीसांना मिठी मारली असती, माझं घर वाचवलं म्हणून.
आमच्या राज्यात मराठीची सक्ती आहे. हिंदूंमध्ये फूट पाडून आज मोह्हमद अली रोडवर फटाके फोडले गेले असतील. हिंदूंना तोडल्याचा आनंद झाला असेल. उद्धव ठाकरेंना 1500 आले नाहीत का? यांचं घर त्याच्यावर चालतं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्हाला उद्धव ठाकरे हे अफजल खान वाटतात. मोदी हे ज्या शाळेत शिकले त्या शाळेत शिकण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.