DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उज्ज्वल निकम होणार राज्यसभेचे खासदार!

भाजप कडून राजकीय पुनर्वसन?

DD News Marathi by DD News Marathi
July 14, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
उज्ज्वल निकम होणार राज्यसभेचे खासदार!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ जुलै २०२५

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची निवड केली आहे.

उज्ज्वल देवराव निकम हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. काही दिवसांपूर्वीच उज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी ही निवडणूक भाजपाकडून लढवली होती. उज्ज्वल निकम यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आली असून ते राज्यसभेतून खासदार होणार आहेत.

देशातील प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे राज्यसभेतून खासदार होणार आहेत. दहशतवादी अजमल कसाबविरुद्धचा खटला लढवण्यासाठी ते ओळखले जातात. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. जोरदार प्रचार करतानाही उज्ज्वल निकम हे दिसले होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे देखील बॅरिस्टर होते. त्यांनी विज्ञान विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली आणि नंतर जळगाव येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याव्यतिरिक्त, उज्ज्वल निकम यांनी टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या आणि मुंबई सामूहिक बलात्कार यासारखे हायप्रोफाईल खटले देखील लढले आहेत. उज्ज्वल निकम यांच्या सोबतच शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांच्याही नावाची घोषणा यावेळी करण्यात आली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #maharashtraassembly#MP#UjjwalNikam
Previous Post

पुण्यातील कॅफे गुडलकबद्दल मोठी बातमी!

Next Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे झाल्यास काय होईल?

Next Post
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे झाल्यास काय होईल?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे झाल्यास काय होईल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.