सोलापूर प्रतिनिधी :
दि. ०४ ऑगस्ट २०२५
सोलापूर शहरात रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण झाली. मृतदेह ताब्यात घेताना नुकसान भरपाईची मागणी करत, मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. मात्र गुन्हा दाखल न करता मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
चन्द्र शेखर दोंतुलु या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी अंत्ययात्रेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीसही काही वेळ गोंधळून गेले होते. पोलीस प्रशासनाने अशा नाजूक परिस्थितीत अतिशय संयम ठेवून मृतांच्या नातेवाईकांची समजूत घालत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करू असा शब्द दिला. संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चन्द्रशेखर दोंतुलु याच्या मृतदेहाची अंत्ययात्रा पोलीस ठाण्याहून स्मशानभूमीकडे नेली.
रविवारी दुपारी सुनील नगर परिसरात शॉक लागून चंद्रशेखर दोंतुलु व गंगाराम ताटी या दोन जणांचा मृत्यू झाला होता.एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून नोंद घेतली होती. पोस्टमार्टम केल्यानंतर शासकीय रुग्णालय प्रशासनाने चंद्रशेखर दोंतुलु यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. मृत झालेल्या चंद्रशेखर दोंतलू याची अंत्ययात्रा घेऊन नातेवाइकांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. चंद्रशेखर व गंगाधर ताटी यांच्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाखाची भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी होती. अचानक अंत्ययात्रा पोलिस ठाण्यात आल्याने पोलिसही गोंधळून गेले. दरम्यान, रात्री साडेअकरा वाजता पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेण्यात आली.
अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक जमले होते. त्यात तृतीयपंथीही सहभागी झाले होते. त्यांनी पुढाकार घेत मृतांना लहान लहान मुले आहेत. ते घरातील प्रमुख होते. यामुळे त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली आणि कारवाईचे आश्वासन दिले.