DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी!

तालुक्याच्या सर्वांगीण, आर्थिक आणि सामाजिक विकासाला मिळेल चालना.

DD News Marathi by DD News Marathi
August 28, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी!

मुंबई प्रतिनिधी :
दि.२८ ऑगस्ट २०२५:

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त जमिनीबाबतचा प्रस्ताव उद्योग विभागाने लवकरात लवकर महसूल विभागाकडे पाठवावा, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील, शेती महामंडळाच्या ताब्यातील १००० एकरहून अधिक जागा या प्रकल्पासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

या मुद्द्यावर मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरात नवे औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी मौजे जंक्शन, भरणेवाडी, अंथुर्णे आणि लासुर्णे या गावांतील तसेच इतर लागणाऱ्या जमिनींसह सविस्तर प्रस्ताव तयार करून उद्योग विभागामार्फत महसूल विभागाकडे सादर करण्यात यावा. हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले की, या प्रस्तावित एमआयडीसीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या जमिनीत भर घालण्यासाठी शेती महामंडळाच्या मालकीचे सलग १००० एकर क्षेत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे. या औद्योगिक प्रकल्पामुळे इंदापूर तालुक्यात विविध उद्योगांची स्थापना होणार असून, स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. हे औद्योगिक क्षेत्र तालुक्याच्या सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीला कृषीमंत्री भरणे यांच्यासह पणनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (व्हीसीद्वारे), तसेच एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #agriculturalminister#dattabharane
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यावर दगडफेक!

Next Post

कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

Next Post
कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.