मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ ऑगस्ट २०२५
आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ नुकताच जाहीर झाला आहे. यासाठी संघात नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. संघातील उपकर्णधारही बदलण्यात आले आहेत. काही वरिष्ठ खेळाडूंना संघात जागा देण्यात आली नाही. यादरम्यान अनेक खेळाडूंनी आपली निवृत्तीची घोषणा केली होती. यातच आता एका खेळाडूने आपल्या निवृत्तीवर मोठे विधान केले आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. मोहम्मद शमीने त्याच्या निवृत्तीबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली. एका मुलाखतीत, जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याच्या निवृत्तीमुळे कोणाचे आयुष्य घडेल, तेव्हा त्याने यावर चोख उत्तर दिले. शमी म्हणाला, ” मी कोणाच्या आयुष्यातील दगड आहे का की लोक अशी अफवा पसरत आहेत?”
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शमीला स्थान मिळाले नाही. परंतु शमीने येथे स्पष्ट केले की, “मी तेव्हाच निवृत्त होईन जेव्हा मला खेळाचा कंटाळा येईल किंवा माझ्यात कोणतीही प्रेरणा शिल्लक राहणार नाही. जेव्हा जेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निवडले जात नाही तेव्हा तो देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग घेईल. काही लोकांची मी निवृत्ती घ्यावी अशी इच्छा का आहे हे मला माहित नाही.”
शमी म्हणाला, “मी निवृत्ती घेतल्यास कोणाचे आयुष्य सोपे होईल? मी कोणाच्या आयुष्यात दगड बनलो आहे की तुम्ही मी निवृत्ती घ्यायची इच्छा करता? ज्या दिवशी मला कंटाळा येईल. मी राजीनामा देईन. जर माझी निवड झाली नाही तर मला काही फरक पडत नाही, मी देशांतर्गत क्रिकेट खेळेन. जेव्हा तुम्हाला क्रिकेटचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही निवृत्त होता आणि जेव्हा तुम्हाला सकाळी ७ वाजता उठायचे नसते तेव्हा. माझ्यासाठी अजून वेळ आलेली नाही. गरज पडली तर मी सकाळी ५ वाजता उठेन.”
शमी या फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा भाग होता. परंतु त्याला आशिया कप २०२५ मधून वगळण्यात आले आहे. शमी म्हणाला की, “माझे फक्त एक स्वप्न आहे आणि मी २०२३ च्या विश्वचषकाचे दुर्दैव २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात बदलू इच्छितो. मला फक्त विश्वचषक जिंकायचा आहे. मला विजेत्या संघाचा भाग व्हायचे आहे. २०२३ मध्ये, आम्ही विजयाच्या खूप जवळ होतो. हे एक स्वप्न होते जे पूर्ण होऊ शकले असते पण कदाचित नशिबाला ते मान्य नव्हते.”