DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

करंजी गावातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी!

शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही - दत्तात्रय भरणे.

DD News Marathi by DD News Marathi
September 24, 2025
in महाराष्ट्र
0
करंजी गावातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी!

अहिल्यानगर प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात गेल्या तीन दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. पाथर्डीतील ९ पैकी ८ मंडलांत अतिवृष्टी झाली. तेथील टाकळी व खरवंडी या दोन मंडलात १५५ मिमी पावसाची नोंद आहे. आज पाथर्डी तालुक्यातील करंजी या नुकसानग्रस्त गावाला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडत लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांचेकडे केली. या कठीण प्रसंगी शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असा विश्वास देत लवकरच पंचनामे पूर्ण करून योग्य मदत केली जाईल असे कृषिमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात झालं असून तब्बल ७७ हजार १५५ हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. यामध्ये १३७ गावांमधील १ लाख १ हजार ५८० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पुराच्या पाण्याने पाथर्डीतील पूल, रस्ते वाहून गेले आहेत. मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील सीना, खैरी, ढोरा, नंदिनी नद्यांना पूर आल्याने अनेक गावे आपत्तिग्रस्त झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतात, घरात पाणी घुसल्याने प्रचंड हानी झाली आहे.

पाथर्डी तालुक्यात पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा कृषी मंत्र्यांकडे मांडल्या. तसेच भरीव मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. पंचनामे पूर्ण होताच त्वरित शासन निर्णय काढून योग्य ती मदत करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी शेतकर्‍यांना दिलं.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

अहिल्यानगरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातुर गावातील क्षेत्राची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी!

Next Post

‘गोकुळ’च्या डोंगळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

Next Post
‘गोकुळ’च्या डोंगळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

‘गोकुळ’च्या डोंगळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.