DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

खाकीतील देवदूताने धावपळ करून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा वाचवला जीव!

सुशांत रणवरेंचं पुण्यात सार्‍या पुण्यातून कौतुक.

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
खाकीतील देवदूताने धावपळ करून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा वाचवला जीव!

पुणे प्रतिनिधी :
दि. २७ नोव्हेंबर २०२५

येरवड्यात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाने पुणेकर भारावून गेले. रस्त्यावर जीव मावळत असताना आजूबाजूची गर्दी फक्त पाहत उभी होती. मदतीची हिंमत कुणी दाखवली नाही. पण त्या क्षणी पोलीस मुख्यालयातील शिपाई सुशांत काशिनाथ रणवरे हे देवदूतासारखे पुढे सरसावले आणि एका अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचवले.

मृत्यूच्या छायेतून बाहेर काढलं

गोल्फ क्लब चौकाजवळील बसथांब्यावर 47 वर्षीय संदीप सावंत हे अचानक छातीत तीव्र वेदना झाल्याने जमिनीवर कोसळले. काही क्षणांतच त्यांचा श्वासोच्छ्वास मंदावू लागला. हे सर्व रणवरे यांच्या नजरेस पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी रस्त्यात थांबवली आणि गर्दी चिरत ते सावंत यांच्या जवळ पोहोचले.

परिस्थिती गंभीर असल्याचे जाणवताच रणवरे यांनी तत्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. योग्य पद्धतीने छातीवर दाब देत त्यांनी सावंत यांचा श्वास परत सुरू करण्याचा प्रयत्न अखंड सुरू ठेवला.

काही मिनिटांनी जवळच्याच एका नागरिकाच्या कारमध्ये त्यांना बसवून रणवरे यांनी स्वतःच गुंजन चौकातील शहा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलला हलवण्यात आले. योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे सावंत यांचे प्राण वाचले, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

धाडस आणि माणुसकीला सलाम

या धावपळीत रणवरे यांनी सावंत यांच्या परिवारालाही तात्काळ कळवून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास मदत केली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तसेच पोलीस दलाने रणवरे यांच्या धाडसाचे, संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे मनापासून कौतुक केले.

गर्दीत शेकडो लोक असतानाही कोणी मदतीसाठी पुढे न आलं; पण रणवरे यांनी दाखवलेल्या धडाडीमुळे एका घराचा आधार वाचला, एका पत्नीला तिचा पती आणि मुलांना त्यांचे वडील पुन्हा मिळाले—हेच त्यांच्या कार्याचे खरे मूल्य आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #heartattack#PunePolice
Previous Post

माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार- महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

‘रॉड घालण्याची धमकी’, ‘वरिष्ठांसोबत रात्र घालवण्याचा दबाव’!

Next Post
‘रॉड घालण्याची धमकी’, ‘वरिष्ठांसोबत रात्र घालवण्याचा दबाव’!

‘रॉड घालण्याची धमकी’, ‘वरिष्ठांसोबत रात्र घालवण्याचा दबाव’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.