DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘रॉड घालण्याची धमकी’, ‘वरिष्ठांसोबत रात्र घालवण्याचा दबाव’!

सेलिना जेटलीचे पतीवर गंभीर आरोप.

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in महाराष्ट्र
0
‘रॉड घालण्याची धमकी’, ‘वरिष्ठांसोबत रात्र घालवण्याचा दबाव’!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २७ नोव्हेंबर २०२५

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. गेल्या वर्षभरापासून तिचा भारतीय सैन्यातील भाऊ परदेशात कैद असून, त्याचदरम्यान तिचे वैवाहिक नातेही तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा पती पीटर हाग याच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सेलिनाने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. तिने पतीविरुद्ध घरगुती अत्याचार प्रकरणी कायदेशीर तक्रार दाखल केली असून, त्या कागदपत्रांमध्ये अनेक गंभीर आरोप नमूद केले आहेत.

मुलांसमोर अपमान केल्याचा आरोप

हिंदुस्तान टाइम्सने उद्धृत केलेल्या न्यायालयीन नोंदीनुसार, सेलिना म्हणते की पीटरचा “राग आणि मद्यपान” यामुळे तिचं वैवाहिक आयुष्य विस्कळीत झालं. तिच्या दाव्यानुसार, तो वारंवार मुलांसमोर तिचा अपमान करीत असे.

“माझ्यावर अत्याचार करण्याची धमकी”

सेलिनाने तक्रारीत नमूद केले आहे की २०१२ च्या दिल्ली बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करून पीटर तिला भीतीदायक धमक्या देत असे. त्यांच्या वादांदरम्यान तो तिच्यावर गंभीर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देत असल्याचा दावा तिने केला आहे.

“इतर पुरुषांसोबत झोपण्याचा जबरदस्तीचा दबाव”

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, पीटर तिला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास प्रवृत्त करत असे. तिने असा आरोप केला आहे की पतीने तिला आपल्या कंपनीतील बोर्ड मेंबरसोबत संबंध ठेवण्यास सांगितले, ज्यामुळे त्याला ऑफिसमध्ये चांगले पद मिळेल.

महागड्या वस्तूंची मागणी

तक्रारीत सेलिनाने असा आरोपही नमूद केला आहे की पीटरने तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबियाकडून महागडे कपडे, दागिने आणि इतर भेटवस्तू मागण्याचा दबाव टाकत असे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबाला लाखोंच्या किमतीचे कफलिंक्स आणि दागिनेही द्यावे लागले.

घराबाहेर हाकलल्याचा आरोप

जुळ्या मुलांच्या जन्मानंतर तिने पतीला पितृत्व रजा घेण्याची विनंती केली होती. त्यावर पीटरने तिला घराबाहेर ढकलल्याचा दावा सेलिनाने केला आहे. त्या वेळी ती स्तनपानासाठीचा ड्रेस घालून होती, आणि एका शेजाऱ्याने तिची मदत केली, असे तिने न्यायालयात सांगितले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #celinajaitly#divorce#harrasment
Previous Post

खाकीतील देवदूताने धावपळ करून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचा वाचवला जीव!

Next Post

“मॅच हरल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाला” — ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेला फोटो व्हायरल!

Next Post
“मॅच हरल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाला” — ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेला फोटो व्हायरल!

“मॅच हरल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाला” — ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेला फोटो व्हायरल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.