DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“मॅच हरल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाला” — ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेला फोटो व्हायरल!

 फॅन्स झाले भावनिक.

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
“मॅच हरल्यानंतर गौतम गंभीर भावुक झाला” — ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेला फोटो व्हायरल!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २७ नोव्हेंबर २०२५

भारतीय कसोटी संघाची कामगिरी अलीकडे बऱ्यापैकी निराशाजनक ठरत आहे. टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर आणखी एक कसोटी मालिका गमावली असून, दक्षिण आफ्रिकेने सलग दोन विजय मिळवत भारताचा व्हाईटवॉश केला आहे. यामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर गंभीरचा एक फोटो सोशल मीडियावर धडाक्यात व्हायरल होत असून, त्यात तो पराभवानंतर रडल्याचा दावा केला जात आहे.

@jod_insane या X हँडलवरून गंभीरचा मैदानावरील एक फोटो शेअर करण्यात आला. त्या चित्रात तो मान खाली घालून चालताना दिसत आहे. काही चाहत्यांनी या फोटोत गंभीर डोळे पुसताना किंवा अश्रू लपवत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र फोटोज थोडे धूसर असल्याने तो प्रत्यक्षात रडला की नाही, हे निश्चित म्हणता येत नाही. तरीही त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी निराशा आणि ओढलेपणा पाहून पराभवाचा परिणाम त्याच्यावर खोलवर झाल्याचं जाणवतं.

गंभीरवर टीकेची झोड

गौतम गंभीर यांनी प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर भारताने घरच्या मैदानावर सलग पाच कसोटी सामन्यांत पराभव स्विकारला आहे. दोन्ही मालिका व्हाईटवॉश झाल्या—पहिली न्यूझीलंडकडून ३-० आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून २-०. त्यामुळे या निराशाजनक कामगिरीसाठी गंभीर जबाबदार असल्याची टीका केली जात आहे.

यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तसेच पुन्हा एकदा WTC फायनलचं स्वप्न हातातून निसटेल, अशी भीती फॅन्स व्यक्त करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #GautamGambhir#whitewash#wtc
Previous Post

‘रॉड घालण्याची धमकी’, ‘वरिष्ठांसोबत रात्र घालवण्याचा दबाव’!

Next Post

“माझ्या पुढे-मागे प्रचंड शक्ती आहे!” बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची गर्जना!

Next Post
“माझ्या पुढे-मागे प्रचंड शक्ती आहे!” बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची गर्जना!

“माझ्या पुढे-मागे प्रचंड शक्ती आहे!” बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची गर्जना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.