DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजूरी!

प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुरक्षित.  

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in महाराष्ट्र
0
पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजूरी!

पुणे प्रतिनिधी :
२७ नोव्हेंबर २०२५

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! शहरातील दोन नवीन मेट्रो मार्गांना केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याने मेट्रो विस्ताराला गती मिळणार आहे. खडकवासला–खराडी आणि नळस्टॉप–वारजे माणिकबाग हे मार्ग मंजूर झाल्यामुळे पूर्व-पश्चिम तसेच दक्षिण-पश्चिम पुणेशी अधिक सहज जोडले जाणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

या नवीन मार्गांमुळे सिंहगड रोडवरील नागरिकांना थेट खराडीपर्यंत मेट्रोने जाणे शक्य होईल. तसेच वारजे–माणिकबाग आणि नळस्टॉप यांना जोडणारा मार्ग कोथरूड व सिंहगड रोडदरम्यानचा प्रवास अधिक सोपा करेल. सध्या खडकवासला ते खराडी प्रवासाला दीड तासापर्यंत वेळ लागतो; मात्र मेट्रो सुरू झाल्यावर हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होईल. नळस्टॉप ते वारजे हा प्रवास तर फक्त १० मिनिटांत शक्य होईल.

स्वारगेट–कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ‘वर्क ऑर्डर’ देखील दिली गेली आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर कात्रजहून निगडी, वाघोली आणि शहराच्या मध्यभागी जाणे अधिक सुलभ होईल. रामवाडी–वाघोली मार्गाच्या दुहेरी संरचनेमुळे काम काही काळ थांबले होते. त्यामुळे मेट्रो मार्गांना मंजुरी मिळण्याबरोबरच काम वेळेत पूर्ण होणेही तितकेच गरजेचे ठरत आहे.

सध्याची मेट्रो स्थिती अशी आहे :

चालू मार्ग : वनाझ–रामवाडी, पिंपरी-चिंचवड–स्वारगेट

सुरू असलेले काम : पिंपरी-चिंचवड–निगडी

लवकर सुरू होणारे काम : स्वारगेट–कात्रज भुयारी मार्ग

पूर्वी मंजूर झालेले मार्ग : वनाझ–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली

नुकतीच केंद्राची मंजुरी मिळालेले मार्ग : खडकवासला–खराडी, नळस्टॉप–वारजे-माणिकबाग

दैनंदिन प्रवासी संख्या : सुमारे २.३० लाख

‘महामेट्रो’च्या स्वारगेट–कात्रज मार्गाला मंजुरी मिळून वर्ष उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. तसेच रामवाडी–वाघोली मार्गाच्या तांत्रिक कारणांमुळे कामाला विलंब झाला आहे. म्हणून केवळ मंजुरी पुरेशी नसून प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, तेव्हाच पुणेकरांना प्रत्यक्ष फायदा मिळेल.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #centralgovernment#NarendraModi#PuneMetro#punemetrophase2
Previous Post

“फडणवीसांनी सांगितलं म्हणूनच उदय सामंत शिंदेंसोबत गेले!

Next Post

निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड!

Next Post
निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड!

निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.