DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं!

पण ती मैदानात मात्र लवकरच दिसणार! तारीख झाली जाहीर.

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकललं!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

स्मृती मानधनाचं लग्न अगदी काही तासांवर आलेलं असतानाच तिच्या वडिलांना, श्रीनिवासन यांना हृदयविकाराचा झटका आला. या अचानक झालेल्या घटनेमुळे स्मृती–पलाश यांचा विवाह अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आला. या दोघांचा विवाह कधी होणार याबद्दल अद्याप काही ठोस माहिती नाही. पण स्मृती मैदानात कधी दिसणार, याची तारीख मात्र आता स्पष्ट झाली आहे.

महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या स्मृतीने विजेतेपदात मोठा वाटा उचलला होता. भारताने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकल्याने तिच्या कामगिरीने पुन्हा एकदा प्रकाशझोत तिच्यावर केंद्रित केला. विजयानंतर पलाश मैदानातच स्मृतीला भेटला आणि दोघांनी सेलिब्रेशनही केलं. याच डी. वाय. पाटील स्टेडियमवर पलाशने स्मृतीला प्रपोज केल्यामुळे हे मैदान तिच्यासाठी खास आठवणींचं ठिकाण ठरलं.

मात्र वडिलांची अचानक बिघडलेली प्रकृती पाहता लग्न पुढे ढकलावे लागले. तरीही स्मृती मैदानात पुनरागमन करणार असल्याची निश्चित तारीख समोर आली आहे.

आताच्या परिस्थितीत क्रिकेटच तिच्यासाठी उत्तम मानसिक आधार ठरू शकतो आणि ती लवकरच भारतीय संघात परतणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. वर्ल्ड कपनंतर आता भारताचा महिला संघ श्रीलंकेविरुद्ध टी–२० मालिकेत उतरणार आहे. भारतातील या दौऱ्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, पहिला सामना २१ डिसेंबरला होईल. पहिले दोन सामने विशाखापट्टणममध्ये तर उर्वरित तीन सामने तिरुवनंतपुरम येथे होणार आहेत.

त्यामुळे स्मृती २१ डिसेंबरला पुन्हा मैदानात उतरू शकते, असे संकेत आहेत. सध्या तरी मालिकेपूर्वी स्मृती लग्न करेल, अशी कोणतीच चिन्हे नाहीत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींना ती प्रथम क्रिकेटच्या मैदानातच भेटणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #cricket#palash#smritimandhana
Previous Post

भाजपा आमदाराकडून माझ्या जीवाला गंभीर धोका!

Next Post

जानेवारीत निवडणुका घेणे कठीण!

Next Post
जानेवारीत निवडणुका घेणे कठीण!

जानेवारीत निवडणुका घेणे कठीण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.