मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ डिसेंबर २०२५
महापालिकांच्या प्रभागरचनेवर आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. राज्यातील नगरपालिका निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. नगरपालिका निवडणुकीत बदलेल्या तारखा, न्यायालयाने ओढलेले ताशोरे, याशिवाय मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्ष अन् नेत्यांनी व्यक्त केलेली नाराजी, यामुळे आयोगाचा कारभार चर्चेत राहिला.
आता महापालिकेच्या निवडणुकांचे संकेत मिळू लागले आहे. परंतु महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर राज्य सरकारने आगामी निवडणुकांसाठी २०२२ च्या कायद्यानुसारच प्रभाग रचना होणार असल्याची माहिती न्यायालयात दिली.
ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार महापालिकेसह अन्य महापालिकांच्या प्रभागरचनेवर आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. आगामी निवडणुकांसाठी २०२२ च्या कायद्यानुसारच प्रभाग रचना होणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.







