DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

VSR कंपनीचं विमान दुर्घटनाग्रस्त.

DD News Marathi by DD News Marathi
January 28, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

बारामती प्रतिनिधी :
दि. २८ जानेवारी २०२६

अजितदादा पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते VSR कंपनीचं असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती परिसरातील शेतात हे विमान कोसळल्यानंतर स्थानिकांना मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि त्यानंतर सलग चार ते पाच स्फोट झाल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. आगीचा भडका इतका प्रचंड होता की ती तात्काळ विझवणं अशक्य ठरलं.

विमान कोसळल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य सुरू करत मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळ, त्यांनी वापरलेला गॉगल आणि अंगावरील जॅकेटवरून पटली. मृतदेह झाकण्यासाठी नागरिकांनी घरातील ब्लँकेट्स आणि कपडे पोलिस व मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत हलवण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न सुरू असताना हे विमान शेतात कोसळलं आणि लगेचच आग लागली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताची माहिती दिली आहे.

एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सांगितलं की, “स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. विमान पेटलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा चार-पाच स्फोट झाले. काही वेळातच मोठी गर्दी जमली. या दुर्घटनेत अजितदादांचं निधन झाल्याचं कळलं.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#Baramati#DevendraFadnavis#NCP#PlaneCrash#SharadPawar
Previous Post

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांना पद्म पुरस्कार!

Next Post

“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

Next Post
“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.