DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

शेतकर्‍यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांच्या वाणांमुळेच - कृषि मंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे

DD News Marathi by DD News Marathi
February 18, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

राहुरी प्रतिनिधी :
दि. १८ फेब्रुवारी २०२६

राहुरी येथे आयोजित फुले कृषि महोत्सव-२०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी, कृषि प्रदर्शन व तंत्रज्ञान प्रसार उपक्रम राबविण्यात आले.

कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच शक्य झाली आहे. शेतीत महिला भगिनी अग्रस्थानी असून त्यांच्या श्रमाची बचत करणारे संशोधन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शासन शेतकरीहितासाठी ५० पेक्षा अधिक योजना राबवत असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावर कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित होते. हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व शेतकरीकेंद्रित संशोधनावर विद्यापीठ भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन, कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन, विविध प्रकाशनांचे विमोचन तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म व अॅप्सचे लोकार्पण करण्यात आले. प्रगतशील महिला शेतकरी तसेच उत्कृष्ट संशोधन कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.

पीक प्रात्यक्षिके, सुधार प्रकल्प, बचतगट स्टॉल्स आणि तंत्रज्ञान प्रदर्शनांना शेतकरी व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ६ हजारांहून अधिक शेतकरी, विद्यार्थी व कृषि क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

महिलांची शेतीतील भूमिका, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरीकेंद्रित संशोधनाचा संदेश देत महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Agriculture#DattatrayBharne#FuleKrishiMahotsav#Rahuri
Previous Post

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

Next Post

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.