DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद.

DD News Marathi by DD News Marathi
February 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई प्रतिनिधी :
दि १९ फेब्रुवारी २०२६

“कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार,वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

एआय फार ॲग्री २०२६ ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम,एफएओ,युएनडीपी,आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (ADB), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर इी सेमी ॲरीड ट्रापीक्स(ICRISAT), भारतीय विज्ञान संस्था (IISc), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.

दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते १० या वेळेत नोंदणी करण्यात येईल.सकाळी १० ते ११.२० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन होईल. जस्मीन हॉल येथे कृषि क्षेत्रात जबाबदार एआयचा वापर करून लिंग आधारित डिजिटल दरी भरून काढणे मिटींग रुम २०४ मध्ये ‘कृषी उत्पादनासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI): लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलबजावणी “ आणि मिटींग रूम २०२ मध्ये ‘संस्थात्मक वित्तपुरवठा माध्यमातून संरचनात्मक आराखडा तयार करूनएआय फॉर ॲग्रीला गती देणे “या तीन विषयावर एकाच वेळी चर्चासत्र होतील.सकाळी ११.२० ते ११.३० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होईल.सकाळी ११.३० ते १ वाजून ५ या वेळेत इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय सचिव देवेश चतुर्वेदी, मुख्य सचिव. राजेश अग्रवाल, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर , डिजीटल एफएओचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देजान जाकोवेजिक, सीफोरआयर इंडिया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य सल्लागार जे. सत्यनारायण , आयएफएडीच्या आयसीटीच्या तांत्रिक कायदेशीर सल्लागार बेंड्रा गुंडे,युनडीपीच्या निवासी सल्लागार डॉ.ॲजेला लुसिगी यांची व्याख्यान होणार आहेत.

दुपारी २ ते २.५० या वेळेत एच. टी. पारेख फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक एस. पारेख,केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महासंचालक, आयसीएआर आणि सचिव (डीएआरई) डॉ. मांगीलाल जाट, इंडिया अल मिशन, अतिरिक्त मिशन संचालक आणि सीईओ अभिषेक सिंह,एडीबी इंडिया रेसिडेंट मिशन श्रीमती मियो ओका, कंट्री डायरेक्टर, कंट्री संचालक मिया ओका,यूएन वुमनच्या कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह इंडिया श्रीमती कांता सिंह यांची व्याख्याने होतील.

कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३ ते ४.१० या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. जितेंद्र सिंह,कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,इंडिया एआय मिशनचे अतिरिक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह,अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाएजिक्स , भिली आदिवासी भाषा, मोठ्या भाषा मॉडेल (LLM) चे लाँचिंग इव्हेंट, महाविस्तार व्हॉइस टेलिफोनी , वनस्पतींचे कीटक व रोग ओळख या विषयी सामंजस्य करार होणार

दुपारी ५ ते ५.३० या वेळेत जस्मीन हॉल येथे मूल्य साखळी ओलांडून : समावेशकता, शाश्वतता आणि कार्यक्षमता वाढवणे , मिटींग रूम २०४ येथे एफॉर ॲरन साठी सामायिक डिजिटल पाया निधीची तरतूद करणे, मिटींग रूम २०२ येथे “स्टॉर्टअप साठी नव्या संधी “ या विषयावर व्याख्याने होतील.

दुपारी ५.३० ते ७.३० या वेळेत “महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज : सुरक्षित, कृषी नवोपक्रमाला गती देणे, “एफपीओ शेतीमधील स्टार्टअप्ससाठी प्रवेशद्वार”या विषयावर मिटीम रूम २०४ येथे व्याख्यान होतील. एआय कन्व्हर्जन्स मार्ग: उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर मिटींग रूम २०२ मध्ये व्याख्यान होतील.संध्याकाळी ७.३० ते ९.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत जॅस्मिन हॉल येथे “कृषी क्षेत्रातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक यांची जागतिक स्थिती” या विषयावर त्याचवेळी मीटिंग रूम २०४ मध्ये “डिजिटल कृषी वित्तीय मॉडेल्सचा विस्तार” या विषयावर तर मीटिंग रूम २०२ मध्ये
“समानतेसाठी कोडिंग : लिंग-आधारित कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय” या विषयावर चर्चा होणार आहे.

दुपारी १२ ते १ या वेळेत जॅस्मिन १ सभागृहात “कृषी-एआय भविष्यकालीन गुंतवणूक : गुंतवणूक, बाजारपेठ व विस्तारक्षम नवकल्पना” या विषयावर ,मीटिंग रूम २०४ मध्ये “सुरक्षा, पारदर्शकता व जोखीम व्यवस्थापन यंत्रणा” या विषयावर, तर मीटिंग रूम 202 मध्ये “दूरसंवेदन व स्थानिक बुद्धिमत्तेद्वारे मोठ्या प्रमाणावर कृषी परिवर्तन” या विषयावर चर्चा होणार आहेत.

दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत जॅस्मिन १ सभागृहात “जागतिक एआय-सक्षम कृषी संशोधन नेटवर्कची उभारणी”या विषयावर,. मीटिंग रूम २०४ मध्ये “‘तिच्यासाठी सह-रचना’ : भारत व जागतिक स्तरावर महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक एआय उपाय” या विषयावर. तर मीटिंग रूम २०२ मध्ये “कृषी क्षेत्रातील जनरेटिव्ह एआय” या विषयावर चर्चा सत्र होणार आहेत. दुपारी ३.३० ते ५.०० या वेळेत ‘गुंतवणूक चर्चा’,सायंकाळी ५.०० ते ५.३० या वेळेत समारोप सत्र, एआयफॉर अॅग्री २०२७ परिषदेच्या थीमची घोषणा करण्यात येणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AI4AIforAgri2026
Previous Post

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

Next Post

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

Next Post

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.