मुंबई प्रतिनिधीः
सध्या कोरोनाची दुसरी लाट आणि आयपीएल चा सीझन एकाच वेळी सुरु आहे. आयपीएल मध्ये मोठमोठे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू खेळत असल्याने भारतीय क्रिकेट प्रेमींना आयपीएल म्हणजे एक पर्वणीच आहे. मात्र, सर्वाधिक वेळा आयपीएल चषक जिंकणा-या मुंबई इंडियन्स या टिमला पुन्हा एकदा पराभव स्विकारावा लागला आहे. काल पंजाब विरोधात झालेल्या सामान्यात मुंबईचा ९ विकेटसने पराभव झाला आहे.
मुंबई इंडियन्स ला ५ पैकी ३ सामान्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या तीन ही सामन्यांमध्ये कमी धावसंख्या आणि गोलदांजीतील निष्प्रभपणा या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. एकेकाळी सर्वात तगडी फलदांजी म्हणून मुंबई इंडियन्सचा गवगवा केला जात होता. मात्र, हिच मुंबई इंडियन्सची उजवी बाजू पार ढेपाळलेली दिसून येत आहे. पंजाब गोलदांजासमोर कालच्या सामान्यात याच फलंदाजीने नांगी टाकल्याचे दिसून आले. तेंव्हा, पुन्हा भरारी घेण्यासाठी मुंबई इंडियन्सला फलदांजी व गोलदांजी अशा दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. तरच, स्पर्धेत अव्वल स्थानी जाता येईल.