DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दुकानांच्या वेळा वाढवून द्या. व्यापाऱ्यांवरील अन्याय आता पुणे शहर भाजप सहन करणार नाही

पुण्यासोबतचा दुजाभाव थांबवा, लॅाकडाऊन विरोधात भाजप आक्रमक

DD News Marathi by DD News Marathi
August 5, 2021
in ताज्या बातम्या
0
दुकानांच्या वेळा वाढवून द्या. व्यापाऱ्यांवरील अन्याय आता पुणे शहर भाजप सहन करणार नाही
पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०५ ऑगस्ट २०२१
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असूनही राज्यसरकाच्या नवीन अनलॉक प्रक्रियेनुसार पुणे शहरातील दुकानांची वेळ मात्र बदललेली नाही. प्रशासनाने पूर्वीचेच नियम लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांची निराशा झाली आहे. व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप पक्ष पुढे सरसावला आहे. लॅाकडाऊनबाबत पुण्याला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे टिकास्त्र सत्ताधा-यांवर सोडले आहे.  
सध्या ७ ते ४ या वेळेत दुकाने उघडायला परवानगी आहे. परंतु प्रत्यक्षात दुकाने सकाळी १० वाजता उघडली जातात व दुपारी ४ वाजता बंद होतात. म्हणजे फक्त सहा तासच व्यवसाय सुरू असतो. पूर्वी ९ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी होती. म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रोज पाचच तास म्हणजेच आठवड्याचे ३० तास कमी झाले आहेत. त्यात शनिवार व रविवार पूर्ण बंद असल्याने प्रत्येकाचा व्यवसाय जवळजवळ ५ दिवस बंद आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. दुकाने बंद पण भाडे चालू आहे, वीजबिल चालू, बॅंकेचे हप्ते सुरूच आहेत. आणि त्याला शासनाकडून कुठल्याही प्रकारची सवलत अथवा सूट मिळालेली नाही. तसेच कर्मचाऱ्यांना पगार देखील द्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे या दुकानांच्या कमी वेळेमुळे गर्दी जास्त होत असल्याने धावपळ मोठ्या प्रमाणात होते.
पुण्यातील व्यापाऱ्यांनी कायमच प्रशासनाला सहकार्य केले आहे आणि पुढे देखील ते सहकार्य तसेच राहिल.परंतु पुणे शहरातील कोरोनाचा बाधित दर कमी असून सुद्धा ग्रामीण भागातील दर कमी न झाल्याने शासनाने व्यापारी व ग्राहकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे कोरोना नियमानुसार पुणे शहरातील नियम शिथिल करून दुकानांची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात यावी तसेच शनिवारी देखील दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी. अशी मागणी पुणे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष श्री.जगदीशजी मुळीक यांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली. विविध व्यापारी संघटना व पुणे व्यापारी महासंघ आणि इतर सर्व व्यापारी बंधू आणि भगिनींच्या आंदोलनाला पुणे शहर भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा राहणार असून व्यापाऱ्यांच्या या असंतोषाला पूर्णतः प्रशासन व शासन यंत्रणा जबाबदार असेल अशी भूमिका जगदीशजी मुळीक यांनी यावेळी स्पष्ट केली.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे, श्रीकांत पाठक,राजेश येणपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, महेंद्र व्यास, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी नक्की शेअर करा
Tags: GirishBapatJagdishMulikPuneBJPकोरोनालॅाकडाऊन
Previous Post

२३ गावांच्या प्रारुप डिपीला मंजुरी : हरकती सुचना मागविणार

Next Post

अकोला वासुद येथे वृक्षारोपणा संदर्भात गावातील युवकांनी राबविला अभिनव उपक्रम

Next Post
अकोला वासुद येथे वृक्षारोपणा संदर्भात गावातील युवकांनी राबविला अभिनव उपक्रम

अकोला वासुद येथे वृक्षारोपणा संदर्भात गावातील युवकांनी राबविला अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.