पुणे प्रतिनिधीः
आम आदमी पक्ष आणि आम आदमी रिक्षाचालक संघटना यांच्या वतीने कोथरुड, कर्वेनगर, वारजे, एरंडवणा येथे पोलिस स्टेशन, चौक्यांचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम राबविण्यात आली.
अलंकार पोलीस स्टेशन, डहाणूकर पोलीस चौकी,कर्वे नगर पोलीस चौकी, वारजे ट्रॅफिक पोलीस चौकी, माळवाडी पोलिस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, किश्किंद नगर पोलीस चौकी, एरंडवणा पोलीस चौकी, पौड फाटा ट्राफिक पोलीस चौकी या ठिकाणी जाऊन निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाचे डॉ अभिजीत मोरे व रोहन रोकडे तसेच आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे केदार ढमाले, उमेश बागडे, आनंद अंकुश, विकास अंकुश, किरण कांबळे यांनी ही मोहिम राबवली.
प्रत्येक ठिकाणी पोलिस विभागातर्फे आम आदमी पक्षाचे कौतुक केले गेले आणि आभार मानण्यात आल्याचे डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले.
#APP #PuneCity