DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय, परीक्षार्थींकडून निर्णयाचं स्वागत

DD News Marathi by DD News Marathi
June 16, 2022
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द 

पुणे प्रतिनिधी

दि. १६ जून २०२२ :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याच्या कमाल संधी मिळणार आहेत. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे.

आतापर्यंत वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी MPSC च्या परीक्षा देण्याच्या कमाल संधींची संख्या वेगवेगळी होती. SC, ST, OBC, OPEN, मराठा अश्या प्रवर्गांनुसार वेगवेगळ्या मर्यादा होत्या. उदा. एका परीक्षार्थीने संगितले की मराठा समाजाला आत्तापर्यंत केवळ सहा संधी होत्या त्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचं दडपण असायचं. शिवाय जातिभेद केला जातोय, यांना संधी जास्त आणि आपल्याला कमी असा आकस मनात निर्माण झाला होता. परीक्षेला बसणार्‍या विविध प्रवर्गांमध्ये एक दुफळी निर्माण झाली होती. पण आता प्रत्येकाला जातीच्या वा प्रवर्गाच्या बंधनाशिवाय वयाच्या कमाल मर्यादेपर्यंत परीक्षा देता येणार आहे. या निर्णयाचे सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

जातीभेदाच्या भावनेमुळे जो रोष विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता तोही आता नाहीसा झाला आहे अशी एक बोलकी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली. या निर्णयामुळे सर्वांना समान न्याय आणि संधी मिळाल्याची भावना सर्व विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

शरद पवार राष्ट्रपती होणार ?

Next Post

दहावीच्या परीक्षेत सर्व सहाही विषयांत प्रत्येकी ३५% गुण मिळवणारा पुणेरी पठ्ठा!

Next Post
दहावीच्या परीक्षेत सर्व सहाही विषयांत प्रत्येकी ३५% गुण मिळवणारा पुणेरी पठ्ठा!

दहावीच्या परीक्षेत सर्व सहाही विषयांत प्रत्येकी ३५% गुण मिळवणारा पुणेरी पठ्ठा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.