मुंबई प्रतिनिधी :
दि. 22 जून 2022
राज ठाकरे यांनी नुकतेच मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा असं युद्ध पुकारलं होतं ज्यात बर्याच प्रमाणात ते सफल झाले. यावेळी ते आडपडद्याने भाजपाला पाठिंबा देत आहेत असे बोलले जात होते आणि शिवसेना त्यांच्या टप्प्यात होती असं एकूण चित्र होतं.
यातला मूळ हेतु महाराष्ट्र सरकारला मोडकळीस आणून ते पाडणे हा होता का? असं त्यांचं अंतिम ध्येय होतं का? असाही संशय बहुतेकांच्या मनात होता. त्यावेळी भाजपाची सुपारी वाजवण्याचे काम ते करतायत असंही बोललं गेलं.
पण आता चित्र अचानकपणे आणि अनपेक्षितरित्या बदललं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र सरकार तसेही धोक्यात आले आहे त्यामुळे आता कोण असा प्रश्न राज यांना पडलेला असावा असं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांपासूनच्या फारकतीला ठळकपणे जनतेसमोर आणण्यासाठी आणि शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा असे रण माजवण्यात आले होते असे बहुतेकांचे म्हणणे आहे. पण आता या मुद्द्याऐवजी भलतेच प्रकरण सरकारच्या लयाला करणीभूत ठरणारसे दिसते आहे. त्यामुळेच राज ठाकरे आता कुणाची सुपारी वाजवणार? असा प्रश्न बहुतेकांपुढे आहे.