दिल्ली प्रतिनिधी :
दि. 24 जून 2022
श्रीमती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदासाठी अर्ज सादर करणार आहेत. मुर्मू या भाजपा प्रणित एनडीए च्या उमेदवार आहेत. काल मुर्मू यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
या भेटीदारम्यान काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी अर्ज सादर करणे आणि त्यानंतरच्या हालचालींवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा हे मैदानात आहेत.
श्रीमती द्रौपदी मुर्मू या संसद भावनाकडे रवाना झाल्या आहेत. तिथे त्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांना अभिवादन करतील यानंतर संसद भावनातच त्या त्यांना भेटायला आलेल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. द्रौपदी मुर्मू आज दुपारी 12 वाजता संसद भवनात राष्ट्रपती पदासाठीचा अर्ज दाखल करतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एनडीए चे बडे राजकीय नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर उपस्थित असतील.
राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे.