मुंबई प्रतिनिधी :
दि. 29 जून 2022
फ्लोअर टेस्ट बाबत हरकत घेणारी शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणी आज संध्याकाळी होणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला प्रचंड वेग आला आहे. फ्लोअर टेस्ट होणार की नाही यावर आता मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. शिवसेनेने याविरुद्ध भूमिका घेतल्याने आज संध्याकाळी 5 वाजता या विषयावर सुनावणी होईल.
सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या दि. 30 जून रोजी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले आहे. या विशेष सत्राचा एकमेव अजेंडा उद्धव सरकार विरूद्धची फ्लोअर टेस्ट हा आहे जिला गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आटोपायला संगितले आहे. यापुढे असंही समजतं की भाजपा आणि काही अपक्षांनी फ्लोअर टेस्टची मागणी केली होती. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. भगतसिंह कोश्यारींची भेटही घेतली होती.
दुसरीकडे असंही समजतं की एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर फ्लोअर टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. “ही फ्लोअर टेस्ट आम्हीच जिंकू” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्याचेही समजते.
महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट होणार की नाही हे जरी सुप्रीम कोर्ट आज संध्याकाळी सांगणार असलं तरी मुंबईत येण्यासाठी निघालेले बंडखोर आमदार स्पाईसजेट ने आधी गोवा आणि तिथून मुंबईला येतील असेही समजते. याच स्पाईसजेटने ते सूरतहून गुवाहाटीला गेले होते.