मुंबई प्रतिनिधी :
दि. 28 जून 2022
महाविकास आघाडी (Mahavikas Agahdi) आणि शिवसेनेत सुरू असलेली बंडखोरी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना मिळूनही सुरूच आहे. आता आज शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेही शिंदे गटात सामील होत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत आज तीन वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी विनंती करून, त्यानंतर त्यांचा निर्णय ऐकून शिंद गटात सामील होणार असल्याचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमुळे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचे प्रचंड नुकसान झाले असून ही आघाडी अशीच राहिली तर त्यामुळे शिवसेनेचे आणखी नुकसान होणार असल्याचे मतही त्यांनी
TV 9 शी बोलताना व्यक्त केले.
विमानतळ आणि पाणीही पळवले
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीमुळे आमच्या मतदार संघाचा विकास झाला नाही तो नाहीच पण त्याच बरोबर होणारे विमानतळ आणि पाणी योजना, बाजार या गोष्टीही मविआमुळे पळविण्यात आल्या. त्यामुळे मविआबरोबर असणे म्हणजे मतदार संघावर अन्याय करण्यासारखे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या गोष्टी उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतरही त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना वाचावी, शिवसेनेचे शिलेदार वाचावे!
महाविकास आघाडीमुळे शिवसेना पक्षाला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदार संघाचा विकास या मविआमुळे झाला नाही. त्यामुळे शिवसेनेतील कित्येक कार्यकर्ते नाराज आहेत. नाराजीमुळे कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. प्रत्येक शिवसैनिकाची शिवसेना वाचावी, शिवसेनेचे शिलेदार वाचावे अशीच भावना असल्याने आपण शिंद गटात जात असल्याचेही त्यांनी सांगितले.