DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बंडखोर आमदारांना समजावण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांची एंट्री

बंडखोरांच्या पत्नींना केला फोन

DD News Marathi by DD News Marathi
June 29, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
बंडखोर आमदारांना समजावण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांची एंट्री

मुंबई प्रतिनिधी :

दि. 28 जून 2022

बंडखोर आमदारांची समजूत घालण्यासाठी शिवसेनेने आता नवे अस्त्र बाहेर काढल्याचे समजते. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आता या कामी मैदानात उतरल्याचे सूत्रांकडून समजते आहे. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांना आपल्या पतीबरोबर बोलावे असे सुचवले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना बंडखोरीला तोंड देते आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या भविष्यावर संकटाचे काळे ढग जमल्याचे चित्र आहे. एका बाजूला शिवसेना ‘त्या’ आमदारांविरुद्ध कठोर कारवाईची तयारी करताना दिसून येते आहे तर दुसरीकडे त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न चालल्याचे दिसून येत आहे. आमदारांना समजावण्यात मुख्यमंत्रीही अपयशी ठरल्याचे दिसते आहे. आता या राजकीय लढाईत सौ. रश्मी ठाकरे याही सामील झाल्याचे सूत्रांकडून समजते. असं समजलं आहे की रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन लावून त्यांच्याशी बोलणी केली आहेत.

दुसर्‍या बाजूला मा. उद्धव ठाकरे हेही मेसेजिंगद्वारे काही आमदारांच्या संपर्कात असून त्यातील काही आमदारांनी आपण शिवसेनेतच असल्याचं सांगितलं आहे असं समजतं. बंडखोर आमदारांकडून आपण शिवसेनेच्या बाजूनं असल्याचं सूतोवाच वारंवार झालंय असंही ऐकिवात आहे. त्यामुळे गोंधळाची परीस्थिती निर्माण झाली आहे. मा. उद्धव ठाकरे यांनी जे आमदार गुवाहाटीहून परत येतील त्यांना सामावून घेण्याची शाश्वती दिली होती आणि ते काहींच्या संपर्कात असल्याचंही ऐकिवात आहे.

शिवसेनेच्या आतल्या गोटातून आमदारांना समजावण्याचे प्रयत्न चाललेले असताना दुसरीकडे पार्टी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कट्टर समर्थकांविरोधात अतिशय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. एक दिवसापूर्वीच शिवसेनेच्या अर्जानुसार डेप्युटी स्पीकर यांनी 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बाजवल्या होत्या.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #EkanathShinde#MaharashtraGovernment#RashmiThackerey
Previous Post

शिवसेनेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विजय शिवतारेही शिंदे गटात

Next Post

नव्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होणार?

Next Post
नव्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होणार?

नव्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.