मुंबई प्रतिनिधी :
दि. 30 जून 2022
पंढरीच्या विठ्ठलाने एकनाथांच्या मस्तकावर जणू वरदहस्त ठेवला आणि मा. एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्रीपदी पक्के झाले. या अचानक झालेल्या फेरबदलामुळे अनेकजण अचंबित झाले असले तरी भाजपाच्या दूरदृष्टीचे आणि मोठ्या मनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबरोबरच डीडी न्यूज मराठीचेही ‘नव्या चेहर्याच्या शक्यतेचे भाकीत’ खरे ठरले आहे.
भाजपा आणि मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्हाला खुर्चीपेक्षा ‘हिंदुत्त्व’ अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे मा. बाळासाहेबांनी ज्यांना पुत्रवत मानून त्यांच्यावर हिंदुत्त्वाचे संस्कार केले त्या एकनाथ शिंदेंना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे असे आम्हाला वाटते.
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात लयाला चाललेल्या आणि केवळ राजकारणापुरतेच उरलेल्या ‘हिंदुत्त्वाचे’ बाळासाहेबांच्या आशीर्वादाने रक्षण करतील अशी खात्री असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदी निवडण्यात आले.