DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नवे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचे काय आहे मावळ कनेक्शन?

2014 च्या पराभवाचा घेतला बदला?

DD News Marathi by DD News Marathi
December 14, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नवे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचे काय आहे मावळ कनेक्शन?

मुंबई प्रतिनिधी :

दि. 04 जुलै 2022

राज्य विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन काल ता. ३ जुलैपासून मुंबईत सुरु झाले. पहिल्या दिवशी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचेअॅड. राहूल नार्वेकर हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे (महाविकास आघाडी) राजन साळवी यांचा पराभव केला. त्यांचे व त्यांच्या आजच्या विजयाचे मावळच्या २०१४ च्या लोकसभा पराजयाशी कनेक्शन आहे असे बोलले जात आहे. त्यांच्या या मोठ्या फरकाच्या विजयाने भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) गटात जल्लोषाचे वातावरण आहे. अॅड. नार्वेकर हे स्वतः कायद्याचे पदवीधर असून एक चांगले वक्तेही आहेत.

२०१४ च्या लोकसभेला शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी अॅड. नार्वेकरांचा मावळात पराभव केला होता. त्याची परतफेड त्यांनी आठ वर्षांनी २०२२ ला काल केली ती विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत. शिवसेनेच्या साळवींचा त्यांनी ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत २०१४ च्या शिवसेनेकडून झालेल्या तशाच पराभवाचा बदला घेतला. त्यांना १६४ तर साळवींना १०७ मते मिळाली. त्यांचा मावळमध्ये २०१४ ला जेव्हा पराभव झाला होता त्यावेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते.

लोकसभेला तिकिट नाकारल्याने ते शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले होते. त्यावेळी ते पक्षात नवखे होते. त्यात मोदी लाट आली. परिणामी युतीचे (शिवसेना) बारणे हे नगरसेवकाचे थेट खासदार झाले.

दरम्यान, गेल्या आठ वर्षात मावळच नाही,तर राज्य व देशाच्या राजकारणातही अनेक स्थित्यतंरे आली.केंद्रातील कॉंग्रेस सरकार जाऊन २०१४ ला भाजपचे सरकार आले.तसाच बदल राज्यातही झाला.दरम्यान, खासदारकीला पराभूत झालेल्या अॅड. नार्वेकरांची २०१६ ला विधानपरिषेदवर नियुक्ती झाली.नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले आणि दुसऱ्या मोदी लाटेत ते दक्षिण मुंबईतील कुलाबा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BJP#RahulNarvekar
Previous Post

एकनाथ शिंदे यांचा छगन भुजबळांना धक्का, ५६७ कोटींना लावला ब्रेक!

Next Post

शिवसेनेच्या आमदारांना आणण्यासाठी हॉटेलमध्ये घुसले होते राष्ट्रवादीचे दोन नेते

Next Post
शिवसेनेच्या आमदारांना आणण्यासाठी हॉटेलमध्ये घुसले होते राष्ट्रवादीचे दोन नेते

शिवसेनेच्या आमदारांना आणण्यासाठी हॉटेलमध्ये घुसले होते राष्ट्रवादीचे दोन नेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऋता–ललितच्या ‘आरपार’चा टीझर ‘सैयारा’ पेक्षा हिट?

ऋता–ललितच्या ‘आरपार’चा टीझर ‘सैयारा’ पेक्षा हिट?

August 11, 2025
‘बिग बॉस’मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष – १० लाखांचा गंडा!

‘बिग बॉस’मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष – १० लाखांचा गंडा!

August 11, 2025
‘मत चोरी’विरोधात राहुल गांधींचा मोर्चा अधिक तीव्र!

‘मत चोरी’विरोधात राहुल गांधींचा मोर्चा अधिक तीव्र!

August 11, 2025
विठुरायाच्या दरबारात पूजा भाषेवरून हिंदी – मराठी वाद?

विठुरायाच्या दरबारात पूजा भाषेवरून हिंदी – मराठी वाद?

August 11, 2025
एका अपघातामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करणार ‘ट्रकवाल्याशी’ लग्न!

एका अपघातामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करणार ‘ट्रकवाल्याशी’ लग्न!

August 11, 2025
रक्षाबंधनाआधीच स्नेहाचा अंत! पुण्यात आणखी एक प्रकार!

रक्षाबंधनाआधीच स्नेहाचा अंत! पुण्यात आणखी एक प्रकार!

August 11, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.