DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

विधानसभेत बोलताना मा. एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात आले अश्रू

सांगितला एक हृदयद्रावक प्रसंग

DD News Marathi by DD News Marathi
July 4, 2022
in राजकीय
0
विधानसभेत बोलताना मा. एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात आले अश्रू

मुंबई प्रतिनिधी :

दि. 04 जुलै 2022

एका दुर्घटनेत मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन मुलांना गमावले होते. सातार्‍यात त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांनी दोन्ही मुलं बुडताना पहिली. त्यानंतर ते एकांतात राहू लागले. त्यांनी राजकारण सोडून दिलं होतं.

महाराष्ट्रात मा. एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलं आहे. पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या दोन मुलांच्या हृदयद्रावक मृत्यूची हकीकत सांगितली. यावेळी “मी गद्दार नाही” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ते शिवसेनेचे पार्षद होते. त्यांनी राजकारण सोडल्यानंतर मा. आनंद दिघे यांनी त्यांना सार्वजनिक जीवनात परत आणलं आणि त्यांना ठाणे नगरपालिकेत सदनाचा नेता बनवलं.

“विश्वास होत नाहीये की मी मुख्यमंत्री म्हणून भाषण देतोय”

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे म्हणाले की आज शिवसेनेच्या भाजपा सरकारचं स्व. बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालं. गेल्या 20 दिवसांपासून 50 आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की मी एक मुख्यमंत्री म्हणून भाषण देतोय. ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण आम्ही एक युती तोडण्याचं धाडस केलंय.

मला उद्धवजींनी फोन केला होता

मा. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की मिशनवर निघण्याच्या एक दिवस आधी मी बेचैन होतो. विधान परिषदेच्या मतदानावेळी माझ्याशी दुर्व्यवहार केला गेला. मुख्यमंत्र्यांनीही मला फोन केला आणि विचारलं की कुठे चाललाय? परत कधी येणार? मी त्यांना सांगितलं की माहीत नाही. पण बाळासाहेबांच्या शिकवणीने मला परत लढण्याची हिंमत दिली. त्या 50 आमदारांचा मला अभिमान आहे ज्यांनी मला पाठिंबा दिला. मला कुणीही विचारलं नाही की आपण कुठे चाललोय किंवा आपण एकदा मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे”.

ते गुवाहाटीला निघून गेल्यानंतर त्यांना मिळत असलेल्या धमक्यांच्या बाबत म्हणाले की “एकनाथ शिंदेच्या घरावर दगड फेकणारा अजून पैदा व्हायचाय! मीच तो होतो ज्याने 16 डान्स बार्स हटवले होते. माझ्याविरुद्ध 100 पेक्षा जास्त केसेस झाल्या होत्या. गॅंगस्टर मला ठार मारण्यासाठी टपले होते. पण मी थांबलो नाही. मा. आनंद दिघे यांनी त्या शेट्टी लोकांना (बार मालकांना) बोलावलं आणि चेतावणी दिली की एकनाथवर एक ओरखडा जरी उमटला तर त्याची भारी किममत चुकवावी लागेल”.

मा. एकनाथ शिंदे यांचं विधानसभेतलं आजचं भाषण बर्‍याच मुद्द्यांना स्पर्श करणारं आणि संमिश्र भावनांनी ओतप्रोत भरलेलं होतं. त्यात भावुकपणा होतं, कणखरपणा होता आणि कोपरखळ्याही होत्या ज्यांनी विरोधकांना गोड बोलत चिमटेही काढले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AnandDighe#CMofMaharashtra#DevendraFadnavis#EkanathShinde
Previous Post

उपासना सिंघने चांगले पेमेंट मिळत असूनही का सोडला ‘द कपिल शर्मा शो’?

Next Post

राज ठाकरे होणार ‘शिवसेनेच्या मुख्य’ पदावर विराजमान?

Next Post
राज ठाकरे होणार ‘शिवसेनेच्या मुख्य’ पदावर विराजमान?

राज ठाकरे होणार 'शिवसेनेच्या मुख्य' पदावर विराजमान?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.