DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘वीरू’ची अखेरची एक्झिट!

धर्मेंद्र यांच्या आठवणींनी अमिताभ भावुक; पोस्टमध्ये मोकळं केलं मन

DD News Marathi by DD News Marathi
November 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
‘वीरू’ची अखेरची एक्झिट!

मुंबई प्रतिनिधी
दि. २५ नोव्हेंबर २०२५

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेकविध भूमिका करणारे, गंभीर ते रोमान्स आणि ॲक्शनपर्यंत प्रत्येक प्रकारात स्वतःची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. तब्येतीशी चाललेल्या दीर्घ लढाईनंतर त्यांनी अखेर प्राण सोडले.

साडेसहासष्ट वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांत प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘शोले’मधला ‘वीरू’ तर लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला. त्यांच्या जाण्यानंतर अनेक सहकलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात आता धर्मेंद्र यांचे जिवलग मित्र अमिताभ बच्चन यांनीही एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

‘शोले’मधील जय–वीरू ही जोडी चित्रपट इतिहासात अजरामर ठरली. विरूच्या जाण्यानं जय म्हणजे बिग बी खूपच हळवे झाले.

अमिताभ बच्चन म्हणाले:

“**धर्मजी…
ते महानतेचं प्रतिकच होते. फक्त त्यांचं व्यक्तिमत्त्वच नव्हे तर त्यांचं मनही तितकंच सुंदर होतं. कोणालाही आपलंसं वाटावं असा त्यांचा स्वभाव होता.

पंजाबच्या मातीतला साधेपणा आणि उब ते आयुष्यभर सोबत घेऊन फिरले. इंडस्ट्री बदलत गेली, पण धर्मजींची ओळख आणि वागणं एकही क्षण हललं नाही.

त्यांचं हसू, त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्यातली माया… या सगळ्यांनी त्यांच्या भोवती एक खास वातावरण तयार होत असे. अशा माणसाची जागा भरून निघणं अवघड आहे. त्यांच्या जाण्यानं हवेतही एक पोकळी जाणवते…**”

ज्येष्ठ अभिनेत्रींनीही आठवणी सांगितल्या

सायरा बानू म्हणाल्या:

“धर्मेंद्र यांच्या जाण्यानं मन खरंच भारी झालं आहे. ते फक्त सहकलाकार नव्हते, आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा होते. ८ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करू असं वाटत होतं. दिलीप साहेब त्यांना धाकट्या भावासारखे मानायचे. आमचं नातं कामापुरतं मर्यादित नव्हतं.

दिलीप साहेब आजारी असताना येणाऱ्या मोजक्या लोकांत धर्मेंद्र नेहमी असत. ते दोघंही खूप खवय्ये. धर्मेंद्र घरी आले की बिर्याणीचा बेत हमखास असे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच माझी त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले.”

शर्मिला टागोर म्हणाल्या:

“मी अगदी अलीकडेपर्यंत त्यांच्याशी बोलत होते. तब्येत ठीक नसल्याचं माहित होतं, पण ते इतक्या लवकर निघून जातील, असं वाटलं नव्हतं.

एकदा ‘चुपके चुपके’च्या शूटला ते उशिरा आले आणि त्या दिवशी ऋषिदांनी त्यांच्या शिवाय संपूर्ण सीन पूर्ण केला. त्यानंतर धर्मेंद्र कधीच उशिराने आले नाहीत. ते केवळ उत्तम सहकलाकार नव्हते, तर सेटवर प्रत्येकाशी नम्रपणे आणि आदराने वागणारे होते. त्यांच्यासाठी श्रीमंत वा गरीब असा फरक नव्हता.”

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

कृषी संशोधनात ‘निष्पत्तीकडून प्रभावाकडे’ बदल: पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळा

Next Post

कोयता गॅंगची धू धू धुलाई!

Next Post
कोयता गॅंगची धू धू धुलाई!

कोयता गॅंगची धू धू धुलाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.