DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कोयता गॅंगची धू धू धुलाई!

पुणे पोलिसांची धडक कारवाई! सर्वत्र कौतुक!

DD News Marathi by DD News Marathi
November 25, 2025
in महाराष्ट्र
0
कोयता गॅंगची धू धू धुलाई!

पुणे प्रतिनिधी ;
दि. २५ नोव्हेंबर २०२५

पुणेकरांना उगाच त्रास देणाऱ्या कोयता गँगवर पुणे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिवसरात्र हैराण करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी शेवटी जाब विचारत, थेट लोकांसमोर कारवाई करून चांगलाच धडा शिकवला. या संपूर्ण ऑपरेशनचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

फुरसुंगी–आदर्श नगर परिसरात शनिवारी उशिरा रात्री या टोळीने घराबाहेर उभी असलेली तब्बल २०–२५ वाहने फोडून भीतीचं वातावरण तयार केलं होतं. सीसीटीव्हीमध्ये आरोपी धारदार कोयत्यांसह गाड्या, रिक्षा आणि इतर वाहनांची बिनधास्त तोडफोड करताना स्पष्ट दिसत होते. यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपींना गाठत अटक केली आणि त्यांना घटनास्थळीच आणून कठोर शिक्षा दिली.

पोलिसांनी आरोपींना टायरमध्ये घातलं आणि बेल्टने चोप देत त्यांची अक्षरशः धिंड काढली. ‘आवाज येतोय का…?’ असा डक शब्दात दिलेला पोलिसांचा संदेश परिसरभर घुमला. ही शिक्षा सार्वजनिक ठिकाणी देण्यामागे गुंडांच्या मनात जरब निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

मागील काही दिवसांपासून वाढत्या गुंडगिरीने हैराण झालेल्या नागरिकांनी या कारवाईनंतर सुटकेचा श्वास सोडला. रात्री अचानक झालेल्या तोडफोडीनंतर निर्माण झालेली दहशत काही अंशी कमी झाली असून, पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाचं जोरदार कौतुक होत आहे. गुंडगिरीला आळा घालण्यासाठी अशा कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचं अनेक रहिवासी सांगत आहेत. वरिष्ठ पीआय अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई पार पाडण्यात आली.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

‘वीरू’ची अखेरची एक्झिट!

Next Post

पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेल्या आणि चाहत्यांच्या मनातील हिरो धर्मेंद्र यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?

Next Post
पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेल्या आणि चाहत्यांच्या मनातील हिरो धर्मेंद्र यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?

पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेल्या आणि चाहत्यांच्या मनातील हिरो धर्मेंद्र यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.