DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड!

नितेश राणेंनी संतपून दिला इशारा.

DD News Marathi by DD News Marathi
November 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
२७ नोव्हेंबर २०२५

मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी घातलेल्या धाडीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. पैसे वाटपाचा गंभीर आरोप करत त्यांनी घरात आढळलेल्या बॅगांबाबत इन्स्टाग्रामवरून थेट प्रक्षेपण करत भाजपवर निशाणा साधला. या घडामोडींवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी कडक प्रतिक्रिया देत निलेश राणेंना इशाराही दिला आहे.

निलेश राणेंनी काल विजय केनवडेकर यांच्या घरात अचानक प्रवेश करून तेथे ठेवलेल्या बॅगांमध्ये निवडणुकीत वापरण्यासाठी रोख रक्कम असल्याचा दावा केला होता. आणखी तीन ते चार बॅगा घरात असल्याचाही त्यांचा आरोप होता.

या आरोपांवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “राजकारणी आहोत म्हणून आम्ही वैयक्तिक जीवन किंवा व्यवसाय ठेवू नये का? विजय केनवडेकर हे अनेक वर्षे व्यवसाय क्षेत्रात आहेत. त्यांच्या घरात व्यवसायासाठी असलेली रोख रक्कम ठेवलेली असेल, तर त्यात गैर काहीच नाही,” असे ते म्हणाले.

रवींद्र चव्हाणांवरील आरोप आणि नितेश राणेंचा इशारा

निलेश राणेंनी मंत्री रवींद्र चव्हाण हे पैशांसह सिंधुदुर्गात येत असल्याचा आरोप केला होता. या दाव्यावर नितेश राणेंनी जोरदार पलटवार करत शिवसेनेला थेट इशारा दिला. “हे सर्व राजकीय आरोप आहेत. उदय सामंतही नुकतेच इथे येऊन गेले. ते कशासाठी आले यावर आम्ही प्रश्नचिन्ह लावू का? त्यांच्या दौऱ्यावर आम्ही गोंधळ घातला तर चालेल का?” असा टोला त्यांनी लगावला.

निवडणुकांबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याची गरज नाही. आमच्याकडे मोदीजींसारखे राष्ट्रीय नेतृत्व आणि फडणवीस साहेबांसारखे मजबूत राज्य नेतृत्व आहे. आम्ही विकास आणि सरकारी योजनांच्या आधारावर जनता सामोरी जातो. या प्रकरणात निवडणूक आयोग आणि पोलीस संपूर्ण तपास करतील. ज्यांच्या घरी पैसे सापडले, त्यांच्या व्यवसायाची तपासणीही होईल. चौकशी पूर्णपणे निष्पक्ष होणार आहे.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #nileshrane#niteshrane
Previous Post

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! केंद्राकडून दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजूरी!

Next Post

पुण्याच्या मध्यवस्तीत, महर्षिनगरमध्ये बिबट्याचा वावर?

Next Post
पुण्याच्या मध्यवस्तीत, महर्षिनगरमध्ये बिबट्याचा वावर?

पुण्याच्या मध्यवस्तीत, महर्षिनगरमध्ये बिबट्याचा वावर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.