DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्याच्या मध्यवस्तीत, महर्षिनगरमध्ये बिबट्याचा वावर?

रहिवाशांमधे भीती आणि संभ्रमाचे वातावरण.

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्याच्या मध्यवस्तीत, महर्षिनगरमध्ये बिबट्याचा वावर?

पुणे प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

महर्षिनगर! पुण्याच्या स्वारगेट जवळील एक गजबजलेला रहिवासी भाग! याला लागूनच आदिनाथ सोसायटी, गुलटेकडी हे भाग येतात. येथे अगदी भरवस्तीत मध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचा फोटो जबरदस्त व्हायरल झाला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आजूबाजूचा परिसर, शेजारी उभे असलेले टेम्पो, पत्रे या गोष्टी आणि चौकात चालणारा बिबट्या या फोटोतील गोष्टींची शहानिशा करण्यात आली. त्यानुसार हा बिबट्या तिथे खरोखरीच २७ तारखेच्या मध्यरात्री फिरत होता असे प्रथमदर्शनी तरी जाणवते. पुण्याच्या इतर भागांतही बिबट्या दिसल्याचे लोक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी धायरी मधील ‘हाय ब्लिस’ सोसायटीच्या आसपासही बिबट्या दिसल्याचे सूत्रांकडून समजते.

cement concrete ची जंगले वाढत चालल्याने आणि डोंगर, झाडी नष्ट होत असल्याने हे प्रकार घडत आहेत असे जाणकारांचे मत आहे.

तथापि महर्षिनगरमध्ये नागरिकांशी संवाद साधला असता संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. काहीजण थोडे चिंतातुर असताना बर्‍याच जणांच्या मते हा फोटो बनावट असल्याचे संगितले जात आहे. विशेषतः युवक वर्ग यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही.

एकंदरीत काही असले तरी हा प्रकार जर खरा असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे हे निश्चित.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bibtya#Maharshinagar
Previous Post

निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड!

Next Post

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भानामतीचा प्रकार!

Next Post
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भानामतीचा प्रकार!

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भानामतीचा प्रकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.