DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची २० लाखांची फसवणूक!

पोलिसांच्या वेषात व्हिडिओ कॉल करून घाबरवले.

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची २० लाखांची फसवणूक!

Cropped shot of an unrecognizable man leaning on his walking stick

पुणे प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

दहशतवादी हल्ला, तसेच मनी लाँड्रिंगसाठी बँक खात्याचा वापर झाल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी पाषाण भागातील एका ज्येष्ठाची २० लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. चोरट्याने ज्येष्ठाशी संपर्क साधताना व्हिडिओ कॉलचा वापर केला होता. चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणे, तसेच मनी लाँड्रिंगसाठी झाल्याची बतावणी चोरट्यांनी केली. या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी त्यांना दाखवली. चोरट्यांनी त्यांना तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांच्या बँक खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी २० लाख ६५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ननावरे करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #cybercrimre#seniorcitizenPune
Previous Post

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भानामतीचा प्रकार!

Next Post

मत कामाच्या जोरावर मागा, पैशांच्या नव्हे!

Next Post
मत कामाच्या जोरावर मागा, पैशांच्या नव्हे!

मत कामाच्या जोरावर मागा, पैशांच्या नव्हे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.