DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मत कामाच्या जोरावर मागा, पैशांच्या नव्हे!

निधीवाटपाच्या बाबत शरद पवारांची टीका.

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मत कामाच्या जोरावर मागा, पैशांच्या नव्हे!

बारामती प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

सद्याच्या प्रचारात कामगिरीपेक्षा ‘पैसे घ्या, निधी मिळवा’ अशा पद्धतीची भाषा डोकावते आहे आणि ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. ‘फक्त पैशाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यावर भाष्य न करणेच योग्य,’ असे म्हणत ज्येष्ठ नेता शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी पवार पत्रकारांशी बोलत होते. “पूर्वी अनेक राष्ट्रीय नेत्यांनी स्थानिक निवडणुकांत अनावश्यक राजकारण न आणण्याची भूमिका ठेवली होती. पण यावेळी विविध गट–उपगट आणि अनपेक्षित आघाड्या तयार झाल्या आहेत. यावरून परस्परांमध्ये सामंजस्य नसल्याचे जाणवते. माझ्यासारखी मंडळी आता या निवडणुकांत पूर्वीइतकी सक्रिय राहत नाहीत. काहीच दिवसांत लोक आपला निकाल देणार आहेत,” असे ते म्हणाले.

आरक्षणाबाबत न्यायालयाची स्पष्ट भूमिका

ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असताना, पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि कठोर दिसते. दोन दिवसांत काय निकाल लागेल, हे सध्या सांगता येत नाही.”

कर्जवसुलीला दिलेली स्थगिती अपुरी

पूर आणि अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतीची जमीन वाहून गेली असून अनेकांची साधनेही नष्ट झाली आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दिलेली एक वर्षाची कर्जवसुली स्थगिती पुरेशी नसल्याची नाराजी पवारांनी व्यक्त केली. “फक्त कर्जवसुली थांबवून उपयोग नाही; सरकारने थेट आर्थिक मदत जाहीर करायला हवी होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #moneyinelections#NCP#SharadPawar
Previous Post

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची २० लाखांची फसवणूक!

Next Post

अजितदादांचा सज्जड इशारा! पुण्यातील ‘राजकीय दादांची’ घाबरगुंडी!

Next Post
अजितदादांचा सज्जड इशारा! पुण्यातील ‘राजकीय दादांची’ घाबरगुंडी!

अजितदादांचा सज्जड इशारा! पुण्यातील 'राजकीय दादांची' घाबरगुंडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.