DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजितदादांचा सज्जड इशारा! पुण्यातील ‘राजकीय दादांची’ घाबरगुंडी!

सभा आणि मेळावे अखंडपणे सुरू.

DD News Marathi by DD News Marathi
November 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अजितदादांचा सज्जड इशारा! पुण्यातील ‘राजकीय दादांची’ घाबरगुंडी!

पुणे प्रतिनिधी :
दि. २९ नोव्हेंबर २०२५

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार जोमात सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा–मेळाव्यांची मालिकाच सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत किती निधी दिला आणि पुढे आणखी किती विकासनिधी मिळू शकतो, यावर त्यांनी खास भर दिला आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीतीलच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे प्रतिस्पर्धी ठरत असल्याने, अजित पवार यांनी जिल्ह्यातील ‘राजकीय दादागिरी’ हा मुख्य निवडणूक मुद्दा बनवला आहे. ‘दादागिरी करणाऱ्यांना काही सुधरणार नाही ,’ असा त्यांचा थेट इशारा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा ठरला आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्वतः पूर्ण लक्ष केंद्रित केले असून, ते विविध भागांत प्रचारसभांना हजेरी लावत आहेत. गेल्या आठवड्यात बारामतीतील मळेगाव बुद्रुक येथे प्रथम सभा घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि त्याच दिवशी बारामतीत दुसरी सभा घेऊन जोरदार वातावरण तयार केले. त्यानंतर १४ नगरांमध्ये आणि ३ नगरपंचायतींमध्ये ते सतत प्रचार करत आहेत.

प्रत्येक सभेत, त्यांनी अर्थमंत्री म्हणून त्या भागासाठी दिलेल्या निधीची आकडेवारी सांगितली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेत आल्यास विकासासाठी अधिक निधी मिळणार असल्याचेही ते मतदारांसमोर स्पष्टपणे सांगत आहेत. मतांच्या मोबदल्यात निधीची भाषा वापरली जात असल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली असली, तरी अजित पवार मात्र ‘तुमच्या भागाचा विकास हवा असेल, तर वोट द्या, निधी मी देतो,’ असे ठामपणे सांगत आहेत.

जिल्ह्यातील अनेक नगरपालिका निवडणुकांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची लढत भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षांशीच आहे. भोर, पुरंदर, दौंड आणि इंदापूर या भागात ही लढत अधिक चुरशीची बनली आहे. भोरचे माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल हे प्रमुख प्रतिस्पर्धी असून, पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील जुन्या राजकीय संघर्षाची छाया दिसते.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीच राजीनामा देऊन हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तसेच भाजपचे प्रवीण माने यांनीही गारटकर यांना पाठिंबा दिला. या घडामोडींमुळे इंदापूरमध्ये अजीत पवार गट अडचणीत आला आहे.

स्थानिक राजकीय नेत्यांकडून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, अजित पवार यांनी अशा राजकीय ‘दादां’ना थेट इशारा देत म्हटले आहे की, ‘दादागिरी करणाऱ्यांना सोडणार नाही.’ त्यांच्या या कठोर भाषेमुळे जिल्ह्यातील दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर अजित पवार कोणती पावले उचलू शकतात याची जाणीव असल्यामुळे, या नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#Indapur#SharadPawar
Previous Post

मत कामाच्या जोरावर मागा, पैशांच्या नव्हे!

Next Post

भाजपा आमदाराकडून माझ्या जीवाला गंभीर धोका!

Next Post
भाजपा आमदाराकडून माझ्या जीवाला गंभीर धोका!

भाजपा आमदाराकडून माझ्या जीवाला गंभीर धोका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’! – देवेंद्र फडणवीस

January 15, 2026

आम्ही केले मतदान, आपणही करा हे श्रेष्ठ दान…राखा लोकशाहीचा मान!

January 15, 2026
अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

अंधार पडताच आचारसंहितेचा भंग?

January 15, 2026
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का!

January 14, 2026
मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

मतदानासाठी पुणे सज्ज; वाहतुकीत मोठे बदल!

January 14, 2026
आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

आता रोखठोक निर्णय झालाच पाहिजे!

December 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.